यंदा आयपीएल चे अर्धेच शेड्युल का आले ? वाचा कारण..

आयपील स्पर्धा क्रिकेटप्रेमींसाठी मेजवानीच असते. दरवर्षी आयपीएलचा थरार अनुभवायला मिळतो. देशभरातील क्रिकेटप्रेमींमध्ये आयपीएलचा फिव्हर चढतो. यावर्षीचे आयपील सामनेही लवकरच खेळण्यात येणार आहेत. पुढील महिन्यात आयपीएलला सुरुवात होणार आहे. त्याचे शेड्युल देखील नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. पण हा शेड्युल पूर्ण सीझनचा नाहीये. यामध्ये फक्त १७ सामन्यांचे टाईमटेबल आहे.

सध्या आयपीएल चा शेड्युल आला आहे पण यात फक्त अर्धाच शेड्युल कसा काय आला असा अनेकांना प्रश्न पडला आहे. एप्रिल मे मध्ये लोकसभा निवडणुका येत आहेत तर जून मध्ये वर्ल्ड कप असणार आहे. त्याच्या अगोदरच २३ मार्च रोजी आयपीएल चा सिझन असणार आहे. त्यात फक्त १७ सामने असणार आहेत.टीम चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल्स चैलेंजर्स बंगलोर यांच्या सामान्याने या वर्षीच्या सिझन ची सुरुवात चेन्नई येथे होणार आहे.

23 मार्च ते 5 एप्रिल या 14 दिवसांच्या कालावधीत 17 सामने खेळवले जाणार आहेत. 24, 30 आणि 31 मार्च या वीकेंडला प्रत्येकी दोन सामने होतील. दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या कालावधीत प्रत्येकी पाच सामने खेळणार आहेत. तर उर्वरित सहा संघ प्रत्येकी चार सामने खेळतील.

आयपीएल चे अर्धे शेड्युल देण्याचे कारण देशातील लोकसभा निवडणूक आहे. लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा मार्च मध्ये होईल त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या वेळा पत्रानुसार आयपीएल चे उर्वरित वेळा पत्रक देण्यात येईल.

खालील प्रमाणे आहे आयपीएल चे शेड्युल-

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *