पाय जमिनीवर असणारे सेलिब्रिटी कीर्तनकार इंदुरीकर महाराज..

मला।चांगलं आठवते गेल्या वर्षी हरियाणा राज्यात बागपत येथे काही कामानिमित्त जाणे झाले होते आणि तिथे एका गावात सायंकाळी मित्राच्या घरी मुक्काम केला होता.त्यारात्री “सपना” नामक डान्सर चा कार्यक्रम होता त्यामुळे गावातील झाडून सारी मंडळी मोठ्या हौसेने सायंकाळपासून पुढे जागा धरायला जाऊन बसू लागली.अर्थातच कुतूहल म्हणून आम्ही सुद्धा या कार्यक्रमाला गेलो.सपना नामक महिला कलाकार हिचे “‘तेरी अख्या का यौ काजल” हे हरियानी गाणे व त्यावर तिने लगावलेले ठुमके पाहिले व त्यावर बेभान होऊन नाचणारा समाज..सारेच चित्र जितके माझ्यासाठी वेगळे होते.

हे चित्र मला आज आठवण्याचे कारण एवढे आहे की आज माझ्या महाराष्ट्रात सुद्धा गावोगावी लाखोंची गर्दी जमवणारा एक सेलिब्रिटी आहे,ते डान्सर पण आहेत..”विठ्ठल, विठ्ठल आळवत हा हरिभक्त बेभान होऊन नाचतो आणि माझ्या मराठी लोकांना नाचायला भाग पाडतो.. रोजच्या छोट्या छोट्या गोष्टीतून विनोदी शैलीतून कीर्तने करतो आणि त्याच्या कीर्तनाला लहान,थोर सारेच तोबा गर्दी करतात.

एकीकडे महिला नृत्यावर थिरकणे सुरू आहे तर एकीकडे तुकोबारायांच्या,ज्ञानोबांच्या अभांगवर बेभान होणे सुरू आहे हा फरक आहे इतरांच्यात व आपल्या महाराष्ट्रात. हे सेलिब्रिटी आहेत हरिभक्त परायण निवृत्तीबुवा इंदुरीकर देशमुख आणि त्यांना सेलिब्रिटी ही उपमा एवढ्यासाठी लावली कारण त्यांचे कीर्तन ठेवायला सध्या तरी 2021 डिसेंम्बर पर्यंत तरखाच शिल्लक नाहीत.

मंडळी..आजच्या आधुनिक युगात 100% समाज मोबाईल मध्ये गुंतून पडला असताना एका साधारण माणसाने स्वतःच्या वेगळ्या शैलीने किर्तनाकडे समाज आकर्षित केला आहे व त्यांचे कीर्तन पाहायला जणसमान्यांची लाखोंची गर्दी होते हे खरंच आजच्या युगात खूप मोठी गोष्ट आहे. ना मोठमोठे अलंकारिक शब्दसंग्रह आहेत ना गंभीर विषयाला धरून तासनतास चिंतन आहे..गंभीर विषय विनोदी शैलीतून जनतेला सांगणारे आणि हसत हसत ते पचनी पाडणारे निवृत्तीबुवा आजच्या अधोगतीला जाणाऱ्या समाजाला तारण्याचे काम मोठ्या तडफेने करतात.

शिर्डी जवळ ओझर या खेडेगावात यांचे घर आहे,घरात भांडीकुंडी कमी मात्र सन्मानचिन्हे आणि परितोषिकांचा गराडा आहे.उगवणारा दिवस महाराष्ट्रभरातून कीर्तनाची तारीख घ्यायला आलेल्या लोकांनीच सुरू होतो.दारात मोठी गोशाळा आहे,अनाथ मुलांसाठी मोफत शिक्षण देणारी संस्था आहे अश्या बऱ्याच विधायक गोष्टीत महाराज अखंड महाराष्ट्रभर फिरत असतात.

महाराष्ट्रात रात्री कितीही वाजता कीर्तन संपले तरी परत रात्री घरीच येतात व सकाळी पुन्हा दिनचर्या सुरू. इतके उत्तुंग व्यक्तिमत्व मात्र अहंकाराचा कुठेही वारा नाही.समोर येणाऱ्या प्रत्येकाला नेहमीच्या शैलीत बोलून कीर्तनाचा तारखंबाबत विवेचन करतात. महाराजांची छोटी डायरी आहेत त्यात दररोज 3 कीर्तने याप्रमाणे 2021 डिसेंम्बर पर्यंत तरखाच शिल्लक नाहीत.

काय लिहावे आणि किती असे होते जेव्हा निवृत्तीबुवा यांच्यासारखी माणसे भेटतात. Youtube सारख्या प्रसारमाध्यामात तर काही पोरांनी त्यांच्या किर्तनातील वाक्ये घेऊन DJ remix गाणी बनवली आहेत. कित्येकांनी कमेंटद्वारे महाराजांच्या कीर्तनाने माझे आयुष्य सुधारले अशीही प्रतिक्रिया नोंदवली आहे.

महाराजांनी तरुणाई कीर्तनाला खेचून आणली ती स्वतःच्या वक्तृत्वावर व विशिष्ट कीर्तनशैलीवर. महाराष्ट्राला असणाऱ्या थोर वारकरी संप्रदायातील एक अनोखा मात्र वेगळ्या ढंगाचा राष्ट्रसंत म्हटले तरी त्यांच्यासाठी ही उपमा वावगी ठरणार नाही.

नुकतेच आमच्या वडिलांच्या 60व्या वाढदिवसानिमित्त त्यांचे कीर्तन आम्ही गावी ठेवले..आमच्या दारी ते येणे म्हणजे केवळ लाल मातीचा आशीर्वाद होय. हरिभक्त परायण निवृत्तीबुवा देशमुख यांचे कीर्तन प्रत्यक्ष ऐकणे म्हणजे एक पर्वणीच असते.दोन अडीच तास कसे भूतकाळात जमा झाले याची जाणीव सुद्धा होत नाही आणि कीर्तन संपले की भक्तिरसात न्हाऊन निघाल्याची अनुभूती मात्र नक्कीच येते.

धन्यवाद
पै.गणेश मानुगडे
कुस्ती-मल्लविद्या महासंघ

kustimallavidya.org

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *