नितीन गडकरींचा पाकिस्तानला मोठा दणका! अशाप्रकारे घेणार पुलवामाचा बदला..

देशाच्या कठीण प्रसंगी हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला या प्रकारचे वर्णन आपण यशवंतराव चव्हाण यांच्याबद्दल ऐकत आलो आहोत. याच महाराष्ट्रातील मातीतील नितीन गडकरी यांनी केलेल्या कृतीमुळे पाकिस्तानची हवा निघून गेली आहे. पाकिस्तान ची मस्ती जिरवयाचे काम नितीन गडकरी यांनी केले आहे. आपल्याला प्रश्न पडला असेल कि नितीन गडकरी यांच्या कडे संरक्षण मंत्री पद नाही मग त्यांनी काय केले आहे कि त्याचा चांगलाच पाकिस्तान ला धडा बसतोय.

पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या आत्मघाती हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, पाकिस्तानची सार्वत्रिक कोंडी करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यास भारताने तयारी सुरू आहे. आता सिंधू जल करारातून माघार घेण्याच्या दिशेने भारताने पावले उचलली असून, त्यानुसार काश्मीर खोऱ्यातून पाकिस्तानकडे वाहत जाणाऱ्या नद्यांचे पाणी मोठी धरणे बांधून पूर्वेकडे वाहत येणाऱ्या नद्यांमध्ये वळवण्यात येणार आहे. त्याचा फायदा जम्मू काश्मीर आणि पंजाबसह इतर राज्यांना होणार आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला युद्धखोरीची धमकी दिलेली असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या कृतीने त्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. . पुलवामा आत्मघाती हल्ल्याच्या पार्श्वभुमीवर गडकरी यांनी जो काही निर्णय घेतला त्याचा जोरदार फटका पाकिस्तान ला बसणार आहे. या निर्णयाची अधिकारीक माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट करून ट्विटरवरून दिली आहे.

मोदी सरकार बद्दल जनसामान्य माणसात नाराजी तयार झाली होती कि नरेंद्र मोदी हे पाकिस्तान ला कोणत्याही स्वरूपाचा तात्काळ धडा शिकवत नाहीत.पण आता नितीन गडकरींच्या भूमिकेमुळे सामान्य माणसाला समाधान वाटत आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *