पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यास डाकू मलखान आणि साथीदार सज्ज..

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर अनेक स्तरातून प्रतिक्रिया येत आहे. आता यात डाकू मलखान देखील जुळलेला आहे. चंबळ खोऱ्यात एक काळ आपल्या दहशतीने गाजविणारा डाकू मलखान आहे तरी कोण हे सर्वप्रथम आपण बघूया,

सहा फुट लांब, मोठ मोठ्या मिश्या आणि अंगावर खाकी कपडे बाहेरून डाकू मलखांब यांचे वर्णन असे आहे. एक काळ तो चंबळ खोऱ्याचा राजा होता परंतु १९८२ साली त्याने शस्त्रे टाकली आणि अध्यात्मिक मार्गाकडे तो लागला. परत आता त्याचे नाव चर्चेत आले आहे. २० फेब्रुवरी ला कानपूरला झालेल्या कार्यक्रमात डाकू मलखान यांनी सांगितले कि “हत्यार ठेवले आहेत परंतु चालवायला विसरलो नाही आहे”

तो म्हणतो कि ” मध्य प्रदेशात आता ७०० डाकू बाकी राहिलेले आहेत. आम्हाला बिना वेतन देशाच्या सीमेवर पाठवून द्या. १५ वर्ष जंगलात आम्ही अशीच नाही काढली. आई भवानीच्या कृपेने मला काहीच होणार नाही. परंतु पाकिस्तानला त्याची औकात दाखविल्या शिवाय राहणार नाही” असा डाकू मलखान या कार्यक्रमात बोलला आहे.

या मध्ये मरण आले तरी बेहतर परंतु वापस येणार नाही असे मलखान बोलले आहे. जर असा परतलो तर परत मलखान नाव लावणार नाही अशी भीष्मप्रतिज्ञा त्यांनी केलेली आहे. अर्जुन सिंह मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री असताना डाकू मलखान याने आत्मसमर्पण केले होते. तेव्हा मलखान भर स्टेजवर बोलला होता कि ” इथे उपस्थित असलेल्या लोकांपैकी कोणीही सांगावे कि मलखान ने या स्त्रीच्या अंगावर हात टाकला किंवा तिची चांदीची अंगठी घेतती तर आजच या सभा मंडपात मी फाशी घ्यायला तयार आहो.

कानपूर येथील सभेत त्यांनी बीजेपी वर देखील ताशेरे ओढले कि जर आपल्याला एखाद्या गोष्टीची पूर्तता करता येत नसेल तर खोटे आश्वासने देऊ नये. वेळ पडल्यास लोकसभा निवडणूक लढविणार असे देखील त्यांनी सांगितले आहे. आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.

आपल्या कडील माहिती तुम्ही आम्हाला info@khaasre.com वर पाठवू शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *