छोटासा देश आर्मीसाठी आहे खूप प्रसिद्ध! स्त्रियांना देखील लष्करी प्रशिक्षण घेणं असत आवश्यक..

पुलवामामधील दहशतवादी हल्ल्यानंतर जगभरातुन भारतासाठी मदतीचे हाथ पुढे येत आहेत. यामध्ये अजून एका देशासाठी मदतीचा हाथ समोर आला आहे. तो देश छोटासा असला तरी या देशाची आर्मी खूप प्रसिद्ध आणि ताकदवान आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून व आधुनिक शस्त्रास्त्रे चालवण्यात हे सैनिक तरबेज असतात. खासरेवर जाणून घेऊया भारताच्या या मित्र देशाविषयी..

छोटासा देश असतानाही आर्मीसाठी प्रसिद्ध असलेला हा देश आहे इस्त्रायल. इस्त्रायल हा देश आर्मीसाठी प्रसिद्ध असून विशेष बाब म्हणजे येथिक स्त्रियांना देखील लष्करी प्रशिक्षण घेणे आवश्यक असते. इस्त्रायलच्या लष्कर, नौदल आणि वायुदलामध्ये खूप चांगले संबंध आहेत. त्यामुळे हि आर्मी अधिक शक्तिशाली आहे. येथे सेनेच्या प्रत्येक जवानांना इतकी ट्रेनिंग दिली जाते की वेळ आली तर ते मिसाईल डिफेंस सिस्टमदेखील ऑपरेट करू शकतात.

इस्रायलहा देश भारतासाठी अनेकदृष्टीने महत्वपूर्ण आहे. इस्रायल भारताला शस्त्रपुरवठा करणारा तिसरा सर्वात मोठा स्रोत आहे. इस्राईलची लोकसंख्या हि न्यूयॉर्कच्या निम्मीच आहे. तसेच इस्त्राईल हा जगातील असा एकमेव देश आहे जिथे महिलांना लष्करी प्रशिक्षण घेणे बंधनकारक आहे. इस्त्राईल हा जगातील ९ देशांमध्ये सामील आहे ज्यांच्याकडे स्वतःची सॅटेलाईट सिस्टीम आहे.

इस्त्राईलची वायुसेना हि जगातील चौथ्या क्रमांकाची वायुसेना आहे. इस्त्रायली वायुसेना हि हल्ला झाल्यावर फक्त उत्तर देण्यातच सक्षम आहे असे नाही तर ते शत्रूला क्षणार्धात नष्ट करण्याची क्षमता ठेवतात. इस्राईलकडे जाणारे मिसाईल हे रस्त्यातच दम तोडते. इस्त्राईलने आतापर्यंत ७ मोठ्या लढाया केल्या आहेत. ज्यामध्ये त्यांनी अधिकवेळा विजय मिळवला आहे. इस्त्राएल आपल्या जिडीपी मध्ये सर्वाधिक खर्च रक्षण क्षेत्रात करणारा देश आहे.

इस्राईलमध्ये सैन्याला प्रशिक्षणासाठी ३ भागात विभागले जाते. त्यामध्ये पाहिलं रेगुलर सर्व्हिस अंतर्गत येथील प्रत्येक नागरिकास सैन्याचे मूलभूत प्रशिक्षण दिलं जाईल. दुसरं कायम सेवा ज्यामध्ये जे लोक कायमस्वरूपी सैन्यासाठी काम करतात त्यांचं प्रशिक्षण. तर तिसऱ्या भागात रिजर्व सर्विसनुसार सामान्य नागरिकांना वर्षातला एक महिना सैन्यासाठी द्यावा लागतो. लोकांना मर्जीने कोणताही एक महिना निवडावा लागतो ज्या महिन्यात ते सैन्याची सेवा करतील.

भारताचा आहे खास मित्र-

इस्त्राईल हा भारताचा खास मित्र आहे. भारत इस्त्राईलकडून मोठ्या प्रमाणात शस्त्र खरेदी करतो. इस्त्राईल भारताला मिसाईल, अँटी मिसाईल सिस्टीम, युएव्ही, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सिस्टीम अशाप्रकाचे अनेक महत्वाची शस्त्रे पुरवतो.

भारताच्या आणि इस्त्राईलच्या मैत्रीची सुरुवात १९६२ मध्ये झाली होती. १९६२ च्या भारत चीन युद्धात इस्त्राईलने भारताला सैन्य रूपाने मदत केली होती. पाकिस्तानसोबतच्या युद्धादरम्यान देखील इस्त्राईलने भारताला मदत केली होती.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *