देशाच्या रक्षणासाठी चेंडू सोडून ग्रेनेडही हातात घ्यायला तयार आहे हा भारतीय खेळाडू..

जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्यात CRPF चे ४० जवान मारले गेले. देशभरात या हल्ल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे. पाकिस्तानविरुद्ध सर्व भारतीयांच्या मनात तीव्र संताप दिसून येत आहे. पाकिस्तानचा सर्व स्तरातून निषेध नोंदवला जात आहे. प्रत्येक भारतीयांच्या मनात सध्या पाकिस्तानला कसा धडा शिकवता येईल हे बघा अशीच भावना आहे.

शहिद जवानांच्या कुटुंबियांना मदत देखील मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. यामध्ये सेलेब्रिटी आणि क्रिकेटपटू पण आघाडीवर आहेत. वीरेंद्र सेहवाग, अमिताभ बच्चन, सलमान खान यांनी शहिदांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत केली आहे. गौतम गंभीर ने या हल्ल्याचा तीव्र भाषेत निषेध नोंदवला आहे.

गौतम गंभीरने पाकिस्तानसोबत चर्चा करण्याऐवजी थेट मैदानात उतरा आणि युद्ध करा अशी तीव्र भूमिका घेतली. यामध्ये आता भारताचा आणखी एक खेळाडू मैदानात उतरला असून त्याने तीव्र शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने जवानांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत केली आहे. शहिदांना ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका जिंकून श्रद्धांजली देणार असल्याचे विधान त्याने केले आहे.

या भ्याड हल्ल्याचा त्याने तीव्र शब्दात निषेध केला आहे. आपल्या गोलंदाजीने विरोधी संघाची कंबर तोडणाऱ्या शमीने देशसेवेसाठी लष्करात भरती होण्यासाठी तयार असल्याचे देखील म्हंटले आहे. शमीने आपल्या भावना व्यक्त करताना म्हंटले आहे कि जर मला जवानांच्या रक्षणासाठी चेंडू सोडून ग्रेनेड हातात घ्यावे लागत असेल तर ते मी करायला तयार आहे.

यापूर्वी सलमान खानने देखील दिला पाकिस्तानला दणका-

सलमानचा नविन चित्रपट “नोटबुक” चे चित्रीकरण सध्या सुरू आहे व यामध्ये गायक आतिफ असलम ने गाणे गायले आहे. आतिफ हा पाकीस्तानी संगितकार आहे व बॉलीवूड मध्ये तो प्रसिद्ध आहे. परंतू सलमानने त्याचे गाणे या चित्रपटातुन काढण्याचा निर्णय घेतलेला आहे. सलमान या चित्रपटाचा निर्माता आहे व त्याने घेतलेल्या या निर्णयामुळे सगळीकडे त्याची वाह वाह सुरू आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *