कथा भारतासाठी धर्म बदलून पाकिस्तानच्या सैन्यात मेजर बनलेल्या शहीद ब्लॅक टायगरची…

हेरगिरी करणारे सैनिक अनेकदा आपल्या प्राणाची आहुती देतात. हेरगिरी करण्यासाठी अनेकदा मोठमोठी संकटं ते झेलतात. शत्रूंनी ओळखले आणि पकडले तरी ते आपल्या जबाबदारी वरून मागे हटत नाहीत. आपल्या प्राणाची आहुती दिलेले देखील अनेक उदाहरणे आहेत. आज खासरेवर अशाच एका RAW च्या सैनिकाची कथा बघूया.

हि कथा आहे राजस्थानमधील गंगानगर मध्ये एका पंजाबी परिवारात जन्मलेल्या रवींद्र कौशिक उर्फ ब्लॅक टायगरची. लहानपणीपासून रवींद्र यांना नाटकाची आवड होती. त्यांनी तेव्हापासूनच नाटकात आपली कला दाखवण्यास सुरु केली होती. पण कुणाला माहिती होते कि त्यांना मोठेपणी हि कला खरोखर करावी आणि जगावी लागेल.

रवींद्र यांना बघायला तेव्हा लोकं दुरदुरून यायचे. असंच एकदा त्यांचे नाटक चालू होते. थिएटर पूर्ण भरलेले होते. ते नाटक बघायला काही रॉचे अधिकारी देखील आले होते. त्यावेळी त्यांना एका मिशनसाठी एका खास व्यक्तीची गरज होती. नाटकाची स्पर्धा चालू झाली. रवींद्र यांचा नंबर आला. रवींद्र अभिनयात तरबेज होते. ते आपल्या अभिनयाने बसलेल्याना उठून टाळ्या वाजवण्यास मजबूर करायचे. रॉ चे अधिकारी देखील त्यांच्या अभिनयावर खुश झाले.

त्याचवेळी त्यांनी ठरवलं कि रवींद्र यांना त्यांच्या खास मिशनसाठी विचारायचे. त्यांच्या मते रवींद्र यांच्यामध्ये सर्व गोष्टी होत्या ज्या रॉमध्ये जाण्यासाठी गरजेच्या होत्या. रॉचे अधिकारी रवींद्र यांना भेटले आणि त्यांना रॉचा हिस्सा बनण्याचा प्रस्ताव दिला. विषय देशाचा असल्याने रवींद्र यांनी देखील तो प्रस्ताव स्वीकारला. सर्व प्रक्रिया पूर्ण करून लवकरच ते रॉचा हिस्सा बनले. त्यांना त्या मिशनच्या ट्रेनिंगसाठी दिल्लीला पाठवण्यात आले.

१९७१ च्या युद्धानंतर भारताला पाकिस्तानवर होती शंका-

तो काळ होता १९७५ चा. १९७१ चे युद्ध होऊन काही वर्षच उलटले होते. तेव्हा भारताला शंका होती कि पाकिस्तान पुन्हा काही कूटनीती करेल. त्यामुळे सर्व प्लॅनिंग केले जात होते. पाकिस्तानच्या पुढे आपण २ पाऊल राहू असे ते प्लॅनिंग करण्यात आले होते. याच प्लॅनिंगनुसार रवींद्र यांना तयार करण्यात आले. त्यांना पाकिस्तानमध्ये जाऊन भारताला गुप्त माहिती पुरवण्याची मोठी जबाबदारी देण्यात आली.

त्याना ट्रेनिंगदरम्यान पाकिस्तानमध्ये कामा पडतील अशा सर्व गोष्टी शिकवण्यात आल्या. या मिशनमध्ये त्यांच्यापुढे सर्वात मोठ आव्हान होतं ते म्हणजे धर्म बदलणे. त्यांना पाकिस्तानमध्ये जाण्यासाठी मुस्लिम बनावे लागले. ते एक चांगले कलाकार असल्याने त्यांना यामध्ये जास्त काही अडचण नाही आली. थोड्याच दिवसात ते पूर्णपणे मुस्लिम बनले. त्यांचे हे मिशन दिसतं तेवढं सोपं नव्हते. कधीही जीव जाण्याचा धोका असताना देखील या कलाकाराने हे मिशन स्वीकारले होते.

ते पाकिस्तानमध्ये दाखल झाले. पाकिस्तानमध्ये रवींद्र कौशिक हे आता नबी अहमद शाकिर बनले होते. सुरुवातीला त्यांनी कराची मधील विद्यापीठात वकीलीचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पाकिस्तान सैन्यात ते भरती झाले. थोड्याच कालावधीत ते सैन्यात मोठ्या पदावर पोहचले. त्यादरम्यान त्यांनी बरीच गोपनीय माहिती भारताला दिली. त्यांनी दिलेली बरीचशी माहिती भारतासाठी खूप महत्वपूर्ण ठरली.

तिथे त्यांना एका मुलीवर प्रेम देखील झाले आणि त्यांनी तिच्या सोबत लग्न केले. पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणांपासून बचावासाठी त्यांनी खतनाही केला होता. त्यांचे आयुष्य तिथे सामान्य झाले होते. त्यांना त्यादरम्यान एक अपत्य देखील झाले. तेव्हा भारतातून त्यांना एक साथीदार पाठवत असल्याचा निरोप मिळाला. त्यांनीहि त्यासाठी सहमती दर्शवली. तो साथीदार पाकिस्तानमध्ये पोहोचण्यात तर यशस्वी झाला पण त्याला पकडण्यात आले.

1979 ते 1983 या काळात त्यांनी भारताला महत्वाची माहिती पुरविली. त्याचा भारतीय सेनेला मोठा फायदा झाला. यामुळे भारतीय सैन्यामध्ये ‘ब्लॅक टायगर’ या नावाने ते ओळखले जाऊ लागले. ही उपाधी त्यांना स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी दिली होती. १९८३ मध्ये इनायत मसीह याला रॉने पाकिस्तानात पाठविले होते. त्याला रविंद्र यांच्याशी संपर्क साधण्याचे काम दिले होते. मात्र, इनायतला पाकिस्तानी गुप्तहेरांनी ओळखले आणि रविंद्र यांची खरी ओळख उघड झाली होती.

पाकिस्तानी सेनेने रविंद्र यांना सियालकोटच्या तुरुंगात डांबले होते. तेथे त्यांना दोन वर्षे टॉर्चर केले जात होते. त्यानंतर मियावली जेलमध्ये आजार आणि छळ केल्याने त्यांचा मृत्यू झाला होता.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *