आदरणीय, ५६ इंचाची छातीवाले मोदी साहेब मी शहिद बोलतोय… एका शहिदाचे मोदींना खुले पत्र!

मी शहिद बोलतोय…

आदरणीय, ५६ इंचाची छातीवाले मोदी साहेब
मरण यावं ते देशासाठी लढतानाच यावं, ही प्रत्येक सैनिकाचीच इच्छा असते…पण, पुलवामात आम्ही शहिद झालो, तेव्हा ना कुठलं युद्ध होतं, ना कुठला गोळीबार सुरु होता….नपुसंकांनी न कळत आमच्यावर हल्ला केला आणि आम्ही शहिद झालो..या हल्ल्यात माझ्यासह अनेक सैनिक शहिद झाले त्यापैकीच मी एक बोलतोय….

एवढा मोठा हल्ला कसा झाला? हल्ल्यांची माहिती असताना निष्काळजीपणा का केला गेला? अजून किती जवान शहिद होणार आहेत? किती हल्ले भारतानं सहन करायचे? असे अनेक प्रश्न मनात घर करून बसलेयत.

मोदीसाहेब तुम्ही वारंवार भाषणात तुमच्या ५६ इंचाच्या छातीचा उल्लेख करत होतात, तेव्हा आमची छाती अभिमानानं फुगायची..”यह बंधा हंगामा मचाएगा” असं आम्ही सर्व जवान आपआपसांत चर्चा करायचो.काय झालं हो त्या ५६ इंचाच्या छातीचं? पटाणकोट, उरी आणि रोजच्या चकमका होतात, त्या ५६ इंचाच्या छातीमधला दम फक्त भाषणात दिसला प्रत्यक्षात नाही…का असं?

मोदी साहेब याचं उत्तर द्यावच लागेल.तुमच्यात कार्यकाळात हल्ल्यांची आणि शहिद जवानांची संख्या जास्त आहे. तुमच्याच गृहखात्याच्या आकडेवारीनुसार २०१४ के २०१८ या चार वर्षात ९१ जवान शहिद झाले. तर दहशतावाद्यांच्या कुरापत्याही दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. ही बाब तुमच्या कारकीर्दीसाठी नक्कीच साजेशी नाही.

सैन्यात भरती होताना आमची छाती, उंची मोजून घेतली जात, पण तिरंगा लपेटलेल्या शव पेटीत ना माझी छाती होती ना उंची, होतं ते छिन्नविच्छिन्न झालेले शरीराचे तुकडे…आई-वडिल त्यांचा आधार गेला म्हणून, बायको तिचा सोबती गेला म्हणून तर, माझं लेकरू डोक्यावरचं छत्र गेलं म्हणून आणि संपूर्ण देश भारतमातेचा लेक गेला म्हणून हंबरडा फोडून फोडून रडत होते. हा तुमच्या आणि आमच्या छातीतला फरक आहे.

आयुष्यात हा दिवस कधीतरी येणार हे सैन्यातल्या प्रत्येक कुटुंबीयांना माहित असतं, पण या भ्याड हल्ल्यात गेल्याचं त्यांना जास्त दुःख होतंय.. कारण त्यांना माहित आहे, या भारतमातेच्या सुपुत्रात दहा हत्तीचं बळ आहे. भारतमातेचं रक्षण करताना जीवाची बाजी लावण्याची ताकद त्याच्या मनगटात ठासून भरलीय. लढताना शंभर दुश्मनांना मारूनच तो शहिद होईल.पण पुलवामाच्या भ्याड हल्ल्यात शहिद झाल्याचं दुःख मनाला वारंवार सलतंय..एकादं पिसाळलेलं कुत्रं यावं आणि पाठीमागून चावावं अशी गत या पाकिस्तानची झालीय. भारताचा सैनिक हा गोळी छातीवर झेलणारा आहे, पण कुत्र्यांचीच औलाद ती, समोरून वार करण्याची हिम्मत नाही म्हणून लपून छपून आले आणि हल्ला करून गेले.

पाकड्यांनी हिम्मत असेल तर आजही समोरून हल्ला करावा आणि राजकारण्यांनी राजकारण बाजूला ठेवावं, मग माझा सैनिक दाखवेल हल्ला कसा करतात ते… आजवरच्या इतिहासात पाकड्यांनी पाठीवरच वार केलेयत. आजवरच्या लढाईत त्यांना कधीच विजय मिळवता आला नाहीय. कधीपर्यत सहन करायचं? आणि का? पाकिस्तानला धडा कधी शिकवणार? तुमच्या कारकीर्दीत हल्ले किती झाले? पाकिस्तानला प्रतुत्त्यर किती दिलं? तुम्हाला चांगलंच ठाऊक आहे. एका दिवसा आड बातमी येते दहशतवाद्यांच्या चकमकीत भारताचे जवान शहिद, मोदी साहेब किती दिवस अजुन….रक्त सळसळतं आमचं जेव्हा आमचा जवान शहिद होतो..या हल्ल्याचा बदला हवाय…

पण तुमची पाकिस्तान नीती हा एक संशोधनाचा विषय आहे. भले तुमच्यात भारतमातेचं रक्त सळसळतंय….पण साहेब तुम्ही जेवढं ५६ इंच की छाती ज्या जोशने बोलता तो तुमच्या कर्तृत्वात दिसत नाही. पंतप्रधानपदाची शपथ घेताना तुम्ही पाकड्यांना आमंत्रण दिल..चला आम्ही मान्य केलं, कारण तुमच्या मनात काही तरी वेगळं चालू असेल असं आम्ही समजलो.

ते झालं तर तोपर्यंत तुम्ही अचानक पाकिस्तानशी चर्चा तोडली. आता पाकिस्तानशी चर्चा होणार नाही असं तुम्ही तुमची ५६ इंचाची छाती ठोकून सांगितलं.परत काही महिने गेले आणि तुम्हीच आमंत्रण नसताना लाहोरला गेलात.तुमच्या त्या बिनबुलाये दौ-यानंतर पठाणकोटला हल्ला झाला. त्या हल्ल्याची चौकशी करायला तुम्ही कुणाला बोलावलं ? तर ISIला ही तुमची धरसोड नीती देशांतल्या सैनिकांचं आयुष्य उद्धवस्त करते…

मोदीसाहेब ५६ इंचाच्या छातीचं राजकारण करून सत्तेवर आला आहात, ५६ इंचाच्या छातीची खरी ताकद संपूर्ण जगाला दाखवून देण्याची वेळ आली आहे.. माझ्या आई-वडिलांचा आधार, बायकोचं कूंकू आणि माझ्या लेकराचं छत्र गमवल्याचं दुःख माझ्या कुटुंबियांना होता कामा नये…पुलवामाचा बदला घ्यावाच लागेल..

प्रत्येक शहिदीच्या रक्ताचा हिशोब तुम्हाला द्यावाच लागेल, तरच माझ्या आत्माला शांती लाभेल..

जय हिंद, जय भारत
-वैभव परब

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *