सेना बीजेपी युतीचा हा तुफान वायरल चित्रपट आपण बघितला का ?

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजपाची युती होणार कि नाही या खूप दिवसांपासून महाराष्ट्रातील जनतेला पडलेला प्रश्न सुटला आहे. शिवसेना-भाजपा युती करण्याचा निर्णय घेतलाय. गेल्या पाच वर्षांपासून सातत्यानं एकमेकांची उणीधुणी काढणाऱ्या शिवसेना आणि भाजपानं लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एकत्र येण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत याबद्दलची घोषणा केली.

यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपा अध्यक्ष अमित शहा, मनोहर जोशी, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि इतर प्रमुख नेते उपस्थित होते. मागील काही दिवसांपासून भाजप आणि सेनेचे संबंध खूपच ताणले होते. काही दिवसांपूर्वी मित्रपक्षाला पटक देंगे असे विधान अमित शहा यांनी केले होते. तेच भाजपा अध्यक्ष अमित शहा आज युतीसाठी मातोश्रीवर आले होते.

परंतु याच पाच वर्षातील वेगवेगळ्या विधानावर एबीपी माझाने एक चित्रपट रिलीज केलेला आहे आणि हा चित्रपट सोशल मिडीयावर तुफान प्रसिध्द झाला आहे. वेगवेगळ्या चित्रपटातील गाणे एकत्र करून त्यांनी हा चित्रपट बनवला आहे आणि त्यामध्ये या पाच वर्षातील सर्व नेत्यांनी एकमेकावर केलेल्या टीकेचे व्हिडीओ टाकलेले आहेत.

हा व्हिडीओ मनसेच्या पेजवर पब्लिश करण्यात आलेला आहे आणि त्याला कैप्शन पुढील प्रमाणे आहे. मागील पाच वर्षे हिट ठरलेल्या ब्लॉगबस्टर चित्रपटाचा भाग ०२ लवकरच आपल्या भेटीला…! युतीचा संसार तर सुरु झाला, पण ही युतीची लव्हस्टोरी सुरु होण्याआधी गेल्या साडेचार वर्षात किती ड्रामा रंगला ते बघा या फ्लॅशबॅकमधून! #युतीयागिरी

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *