मृत्युच्या ५० वर्षा नंतर हि तो सैनिक करतो भारतीय सीमेचे रक्षण…

मृत्यू जीवनातील अटळ सत्य आहे हे सर्व लोक सांगतात. मृत्यु नंतर कोणी आपले काम केलेले आठवते का ? परंतु आज भारतातील एक अश्या व्यक्ती विषयी माहिती घेऊया ज्याचा पगार मृत्यू नंतर हि सुरु आहे. पंजाब रेजिमेंटचा सैनिक हरभजन सिंघ मृत्युच्या ५० वर्षानंतरही सिक्कीम येथे सीमेचे रक्षण करतो असे येथील लोकाचे मानणे आहे.

इथले सैनिक सांगतात कि हरभजन सिंग चीन ने भारत विरोधी केलेल्या हालचाली पहिलेच आम्हाला सांगतात. तसेच चीनी सैनिकांना त्यांनी केलेल्या चुकी समजावून सांगतात. भारत आणि चीन दरम्यान होणार्या प्रत्येक फ्लैग मिटिंग मध्ये हरभजन सिंग यांच्या करिता एक खुर्ची रिकामी ठेवण्यात होते. कोण होते हरभजन सिंग ? हरभजन सिंग यांचा जन्म ३० ऑगस्ट १९४६ रोजी जिल्ला गुजरावाला सध्या हा भाग पाकिस्तान मध्ये आहे.

हरभजन सिंग २४ पंजाब रेजिमेंटचे सैनिक होते. १९६६ साली ते भारतीय सैन्यात दाखल झाले. परंतु २ वर्षातच १९६८ साली सिक्कीम येथील एका अपघातात त्यांचा मृत्यू झाला. सिक्कीम येथे नदी पार करताना ते खेचरा सोबत वाहून गेले. दोन दिवस त्यांचा मृतदेह सापडला नाही तेव्हा त्यांनी स्वतः एका सैनिकाच्या स्वप्नात येऊन त्याच्या मृतदेहाची जागा सांगितली.

सकाळी सैनिकाला त्या जागेवर हरभजन सिंग यांचा मृतदेह सापडला त्या नंतर हरभजन सिंग यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आला. या चमत्कारा नंतर सैनिकांनि बंकरला मंदिराचे स्वरूप देऊन तिथे हरभजन यांच्या मंदिराची स्थापना केली. परंतु या नंतर अनेक चमत्कार लोकांना अनुभवायला आले त्यानंतर तिथे सैनिकांनी मोठे मंदिर बांधले. “बाबा हरभजन सिंह मंदिर” म्हणून हे मंदिर गंगटोक येथील जेलेप्ला व नाथुला येथील भागात १३,००० फुट उंचीवर स्थित आहे. जु

ने मंदिर १००० फुट उंचीवर होते. मंदिराच्या मध्ये बाबा हरभजन सिंग यांचा फोटो व त्यांच्या काही वस्तू आहे. बाबा हरभजन सिंघ आपली ड्युटी ५० वर्षापासून करत आहे. त्यांना पगार सुध्दा दिला जातो आणि रेंक नुसार त्यांना प्रमोशन हि दिल्या जाते. येवढच नाही तर त्यांना सुट्टीवर २ महिन्यासाठी गावला सुध्दा पाठविण्यात येत होते.

तीन सैनिका सोबत त्यांचे सर्व सामान घरी पाठविण्यात येते आणि २ महिने पूर्ण झाल्यानंतर ते सामान परत आणल्या जाते. बाबाचे सिक्कीम वरून जाणे आणि परत येणे हे मोठ्या यात्रेचे रूप घेत होते. हे बघून काही लोकांनी न्यायालयात धाव घेतली. तेव्हा पासून हा प्रकार बंद झाला. आता बाबा १२ महिने ड्युटीवर असतात आणि त्यांच्या करिता रोज ड्रेस,बूट इत्यादी सामान त्यांच्या खोलीत ठेवल्या जाते.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका..

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *