अन अशाप्रकारे सलमान खानने दिला पाकिस्तानला दणका! घेतला हा मोठा निर्णय..

सलमान खान आपल्या कामासाठी नेहमी चर्चेत राहतो. मग त्याने केलेल्या चुका असो की मदत चर्चेचा विषय आहे सलमान, आज खासरे वर त्याने घेतलेला एक महत्वाचा निर्णय बघुया जो वाचुन तुम्हाला अभिमान वाटेल.

नुकताच झालेला पुलवामा हल्यात सामान्य जनतेसोबत खांद्याला खांदा लावुन सेलिब्रिटी उतरले आहे. धमालच्या निर्मात्यांनी तो पाकीस्तानात रिलीज करणार नाही हे सांगितले आहे. तर शबाना आझमी व जावेद अख्तर ने आपले कराचीतील कार्यक्रम रद्द केले आहेत.

सलमानचा नविन चित्रपट “नोटबुक” चे चित्रीकरण सध्या सुरू आहे व यामध्ये गायक आतिफ असलम ने गाणे गायले आहे. आतिफ हा पाकीस्तानी संगितकार आहे व बॉलीवूड मध्ये तो प्रसिद्ध आहे. परंतू सलमानने त्याचे गाणे या चित्रपटातुन काढण्याचा निर्णय घेतलेला आहे. सलमान या चित्रपटाचा निर्माता आहे व त्याने घेतलेल्या या निर्णयामुळे सगळीकडे त्याची वाह वाह सुरू आहे.

सलमान प्रत्येक वेळेस नवीन चेहर्‍याना संधी देतो. सलमानचा नवीन चित्रपट नोटबुकचा पोस्टर शेअर करण्यात आला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन नितीन कक्कड यांनी केलं आहे आणि यामध्ये जहीर इकबाल आणि प्रनुतन बहल प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. दोन्ही कलाकार या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करत आहे.

यापूर्वी सलमान खानने शहिदांच्या कुटुंबियांना धनादेशद्वारे मदत देखील केली आहे. पाकिस्तानचा विविध माध्यमातून निषेध सुरूच आहे. T-Series ने देखील पाकिस्तानच्या गायकांचे गाण्याचे व्हिडीओ आपल्या चॅनेलवरून हटवले आहेत.

सलमानने हा घेतलेला निर्णय आपल्याला पटल्यास नक्की लाईक व शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरु नका.

1 comment

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *