शाहरुख खानने पाकिस्तानला खरंच केली का ४५ कोटी मदत? वाचा तथ्य

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात भारताचे ४० जवान शहीद झाले आणि संपूर्ण देश शोकसागरात बुडाला. काही सेलिब्रेटीने शहीदांच्या परिवारांसाठी आर्थिक मदत हि जाहीर केली त्याबाबत च्या पोस्ट सुद्धा वायरल होत आहेत. याच दरम्यान एक सोशल मीडियावर पोस्ट वायरल होत आहे. त्या पोस्ट मध्ये बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान यांनी पाकिस्तान मधील टँकर स्फोटातील लोकांना ४५ कोटीची मदत केल्याचे म्हटले आहे.पण या बातमीचे वास्तव काय आहे याचा आम्ही शोध घेतला. तो पाहूया..

सोशल मीडियावर वेगवेगळ्या भाषेत शाहरुख खान बद्दल चा मेसेंज वायरल होत आहे. मराठीत डिजाईन सोबत हा मेसेंज वायरल झाला “पाकिस्तान मध्ये झालेल्या टँकरच्या स्फोट मध्ये शाहरुख खान ने केली होती ४५ करोड ची मदत, आता पुलवामा येथे घडलेल्या हल्ल्यात का नाही केली याने मदत हा खरा भारतीय आहे का?”

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख खान बद्दलची भडास काढण्यासाठी अशा प्रकारचे मेसेंज मोठ्या प्रमाणावर वायरल झाले. पण प्रत्येक्षात शाहरुख खान यांनी पाकिस्तान मधील टँकर स्फोटातील पीडितांना कोणत्याही स्वरूपाची मदत नाही केली असे एका हिंदी न्यूज चॅनल ने वायरल मेसेंज ची पडताळणी करताना उघड केले.

शाहरुख खान याने भारतात अनेक दुर्घटना वेळी आर्थिक मदत वेळोवेळी केली आहे. आता पुलवामा घटनेनंतर हि शाहरुख खान यांनी शहिदांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत केली आहे. शाहरुख खान ला दान देताना कोणताही गवगवा करायची सवय नाही. त्याला आपण दान गुप्त द्यावे ते या हाताचे दुसऱ्या हाताला कळू नये अशी त्याची भावना आहे.

भारत सरकारच्या ग्रामीण भागातील योजनांसाठी शाहरुख खान यांनी २५ कोटीची मदत केली होती तसेच चेन्नई पूरग्रस्त केरळ पूरग्रस्त अशा आपत्ती मध्ये हि शाहरुख खान यांनी मदत केली. पण त्यांच्याबद्दल च्या द्वेषातून काही लोक अफवा पसरवतात. पाकिस्तान ला केलेली मदत हि निव्वळ अफवा आहे. त्याच्यात कोणतेही तथ्य नाहीत. त्यामुळे अशा फेक न्यूज वायरल करू नका.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

2 comments

  1. Give a proof please. It’s obvious to ask a question about it. Salman Khan donated it’s in news, Akshay Kumar has donated it’s in news, how to believe he has donated, when he is a super star. How media missed the news? Media never fails to collect news whatever happens in their (Bollywood community) life.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *