अपहरण इंदिराजी असताना देखील झाले होते परंतु अटलजी प्रमाणे त्यांनी माघार घेतली नाही!

पुलवामा येथील दहशतवादी हल्ला झाल्यानंतर अनेकांनी आठवण काढली ती इंदिरा गांधी यांची ती आठवण का निघाली याबद्दल आम्ही आपल्याला सांगणार आहोंत. पुलवामा येथील दहशतवादी हल्ला हा पाकिस्तान पुरस्कृत संघटना जैश ए मोहंमद या संघटनेच्या आतंकवाद्याने केला. हि संघटना आहे मसूद अजहर व मुश्ताक अहमद झरग‍र या दहशतवाद्यांची.. मसूद अजहर हा दहशतवाद्यांचा मोरक्या आहे. भारताच्या विरोधात तरुण मुलांना भडकावून त्यांच्याकडून दहशतवादी कृत्ये तो करत आला आहे.

मसूद अजहर याला १९९४ दहशतवादी कृत्याबद्दल अटक करण्यात आली होती. १९९५ साली काश्मीर मध्ये त्याला सोडवण्यासाठी आतंकवाद्यांनी काही पर्यटकांचे अपहरण केले. त्यातील एक पर्यटक पळून जाण्यात यशस्वी झाला बाकी पर्यटकांची आतंकवाद्यांनी हत्या केली. १९९९ साली अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री असताना मसूद चा भाऊ इब्राहिम अझहर याने विमान अपहरण करायचा प्लॅन केला आणि त्याने काठमांडू हुन दिल्ली ला येणाऱ्या विमानाचे अपहरण केले त्यात एकूण १७८ भारतीय प्रवासी होते.

त्या प्रवाशांना सोडण्याच्या बदल्यात मुश्ताक अहमद झरग‍र,अहमद ओमार शेख व मसूद अजहर या तीन खतरनाक दाशतवाद्यांना सोडण्याची मागणी होती. त्यावेळीच्या सरकारने दहशतवाद्यांच्या मागण्यापुढे झुकून ३ दहशतवाद्यांची मुक्तता केली.

हे तीन दहशतवादी सुटून पाकिस्तान मध्ये जाऊन स्थिरावले आणि त्यांनी भारताविरोधात दहशतवादी हल्ल्याची मोहीम उघडली. याच लोकांनी आता पर्यंत अनेक दहशतवादी हल्ले भारतात घडवले आहेत. भारताची सर्वोच संस्था असणाऱ्या संसदेवर हि जैश ए मोहंमद च्या दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. आता पर्यंत अनेक हल्ले करून शेकडो निरपराध नागरिक आणि जवानांना या दहशतवादी संघटनेने मारले आहे.

जर त्यावेळी इंदिरा गांधी सारखी भूमिका अटल बिहारी वाजपेयी यांनी घेतली असती तर आज हि दहशतवादी संघटना अस्तित्वात नसती. इंदिरा गांधी यांच्या सत्ता काळात भारतीय दूतावासात अधिकारी असणाऱ्या रवींद्र म्हात्रे यांचे अपहरण इंग्लंड मधील बर्मिंघम या ठिकाणी काश्मिरी दहशतवाद्यांनी केले आणि रवींद्र म्हात्रे यांच्या बदल्यात मकबूल भट्ट याला सोडण्याची मागणी केली. इंदिरा गांधी यांची भूमिका दहशतवाद्यांसमोर न झुकण्याची होती.

त्यांनी दहशतवाद्यांच्या मागण्या फेटाळल्या आणि दहशतवादी मकबूल भट्ट ला फाशी देऊन टाकायची प्रक्रिया सुरु केली. चिडून दहशतवाद्यांनी रवींद्र म्हात्रे या अधिकाऱ्याची हत्या केली आणि मृतदेह रोड च्या बाजूला फेकला रवींद्र म्हात्रे हे आपल्या मुलीच्या १४ व्या वाढदिवसाठी केक आणायला गेले होते. त्यांनतर इंदिरा गांधी मुंबई येथे रवींद्र म्हात्रेच्या घरी जाऊन त्यांच्या आई वडिलांची माफी मागितली कि आम्ही तुमच्या मुलाला वाचवू शकलो नाहीत. तसेच देशहितासाठी त्या दहशतवाद्याला सोडणे किती खतरनाक होते हे सांगितले.

इंदिरा गांधी यांच्या त्या कृतीमुळे दहशतवाद्यांना कडक मेसेंज गेला होता कि इंदिरा गांधी या तडजोड करत नाहीत कडक कार्यवाही करतात. त्याची दहशत काश्मीर च्या खोऱ्यात पसरली होती. अशा नेतृत्वाची आणि कठोर निर्णयाची देशाला नेहमीच पोकळी जाणवेल.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *