मुलं-बाळ असलेल्या जोडप्यांचे लग्न लावण्यामागचे कारण वाचून धक्काच बसेल!

मागील वर्षी एका युवकाने दोन मुलीसोबत विवाह केला हे लग्नपत्रिका व फोटो भयंकर वायरल झाले होते. हे अजबगजब लग्न महाराष्ट्रातच पार पडलं होतं. सुरुवातीला या लग्नाविषयी कुतूहल निर्माण झाले होते. पण जेव्हा यामागचे कारण समोर आले होते तेव्हा सर्वानी त्या जोडप्याचे कौतुक केले होते.

आपल्या मतिमंद बहिणीसोबत कोणी विवाह करणार नाही म्हणून दोघींसोबत लग्न करण्याची अट त्या लग्नात घालण्यात आली होती. असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. पण त्यामागचे कारण वाचून तुम्हाला धक्काच बसेल.

सोशल मीडियावर कडेला मुलं असलेल्या जोडप्यांचे लग्न झालेले फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. हा अजब गजब प्रकार शहापूर शहरातील सामुदायिक विवाह सोहळ्यात घडला आहे. या विवाह सोहळ्यात ११०१ जोडप्यांचे विवाह करण्यात आले. भाजप खासदार कपिल पाटील यांच्याकडून हा विवाह सोहळा पार पडला.

खासदार कपिल पाटील यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून हे विवाह करण्यात आले. पण या वैवाह सोहळ्याचे जेव्हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले तेव्हा हा एक घोटाळा असल्याचे समोर आले आहे. एवढ्या मोठ्या जोडप्यांचे विवाह होणार असल्याने या समारंभाची मोठी जाहिरातबाजी करण्यात आली होती.

या सामुदायिक विवाह सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील आमंत्रित होते. पण नोंदणी कमी झाल्याने लग्न झालेले आणि मुलबाळ असलेले जोडपे भांडी कुंडी देण्याचे आमिष दाखवून उभे करण्यात आले होते. या विवाहसोहळ्यात अल्पवयीन तरुणाचे देखील शुभमंगल उरकण्यात आले.

भांडीकुंडी आणि कपड्याचे आमिष दाखवून गोरगरिबांची थट्टा कपिल पाटील यांच्या फाउंडेशनने केली आहे. या विवाह सोहळ्यातील अजून एक प्रताप म्हणजे पित्यासोबत त्यांच्या मुलाचे देखील लग्न लावण्यात आले. हा लाजिरवाणा प्रकार असला तरी गोरगरिबांनी आमिषापोटी हे कृत्य केले आहे. पण असं कृत्य करताना भाजप खासदार कपिल पाटील यांना काही कसे वाटले नाही हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मुलंबाळं असलेली जोडपी उभा करून का होईना ११०१ जोड्यांचा सामुदायिक विवाह सोहळ्याचे टार्गेट मात्र यामुळे पूर्ण झाले.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *