युतीच्या घोषणेनंतर आलेल्या या काही प्रतिक्रिया बघून तुम्हालाही नाही आवरणार हसू!

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजपाची युती होणार कि नाही या खूप दिवसांपासून महाराष्ट्रातील जनतेला पडलेला प्रश्न सुटला आहे. शिवसेना-भाजपा युती करण्याचा निर्णय घेतलाय. गेल्या पाच वर्षांपासून सातत्यानं एकमेकांची उणीधुणी काढणाऱ्या शिवसेना आणि भाजपानं लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एकत्र येण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत याबद्दलची घोषणा केली.

यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपा अध्यक्ष अमित शहा, मनोहर जोशी, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि इतर प्रमुख नेते उपस्थित होते. मागील काही दिवसांपासून भाजप आणि सेनेचे संबंध खूपच ताणले होते. काही दिवसांपूर्वी मित्रपक्षाला पटक देंगे असे विधान अमित शहा यांनी केले होते. तेच भाजपा अध्यक्ष अमित शहा आज युतीसाठी मातोश्रीवर आले होते.

त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यासोबत तब्बल ५० मिनिटे चर्चा केली. शिवसेना-भाजपाच्या संयुक्त पत्रकार परिषदेत जागा वाटपाचा फॉर्म्युलादेखील जाहीर करण्यात आला. लोकसभेच्या 48 पैकी 25 जागा भाजपा लढवणार आहे. तर शिवसेना 23 जागा लढवेल. तर विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष मित्रपक्षाच्या जागा सोडून बाकीच्या निम्म्या निम्म्या जागा लढवणार आहेत.

युतीच्या घोषणेनंतर भाजप सेना ट्रोल-

सेना भाजपने केलेल्या युतीनंतर सोशल मीडियावर दोन्ही पक्षांना मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात येत आहे. उद्धव ठाकरेंनी कोणत्याही परिस्थितीत युती नाही अशी घोषणा अनेकदा केली होती. त्यामुळे आता शिवसेनेला जास्त ट्रोल यामध्ये करण्यात येत आहे. सोशल मीडियावर आलेल्या काही निवडक प्रतिक्रिया बघूया. ज्या बघून तुम्हाला हसू आवरणार नाही.

दीपक टकले यांनी ‘अलका कुबलजीं नंतर नवर्याने कितीही त्रास दिला तरी त्याच्याजवळ नांदणारी फक्त शिवसेनाच’ असे म्हंटले आहे. तर सोनू जयपत्रे यांनी तर उखानाच तयार केला आहे. ते म्हणतात ‘ हातात घेतल पान. पानाला लावला चुना. भाजप रावांच नाव घेते. युती करते पुन्हा’

गौरव बडे म्हणतात ‘चार वर्षात मारली नाही सत्तेला लाथ,आज धरला ‘प्रियकराने प्रेयसीचा’ हाथ..’, विद्यावन पेंडले यांनी देखील एक मजेशीर उखाणा बनवला आहे. ते म्हणतात ‘राजीनाम्यांच्या जिवावर सर्वांना लावला चुना… कमळ रावांचं नाव घेते युती करते मी पुन्हा…!’

संतोष पालांडे यांनी टीका करताना म्हंटले आहे ‘पक्षीय कार्यकर्ते फेसबुक,व्हाट्सएपवर एकमेकांना “घोडा” लावत होते, पण पक्षाने कार्यकर्त्यांनाच बैल लावले बैल,तेही नांगरासकट.’ तर शिवसेना भाजपची पाठराखण करणाऱ्या देखील अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

युतीमुळे विरोधकांचा सुफडा साफ होईल असं मत काहींनी व्यक्त केलं आहे. नितेंद्र मुलाम युतीला पाठिंबा देताना म्हंटले आहे, ‘खुप चांगला निर्णय आहे. हिंदु धर्मा साठी मोदी केंद्रात आणि मराठी माणसां साठी शिवसेना महाराष्ट्र मधे पाहिजे.. काँग्रेस चोरण च्या हातात देश गेला नही पाहिजे’.

माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *