दुधवाली ते ड्रग माफिया वाचा १०० करोडची मालकीण बेबी पाटणकर..

तिच्या कडे बघितले तर तुम्हाला कधीही वाटणार नाही कि हि कोणत्या गैर व्यवहारात असेल. पन्नाशीतील हि महिला मुंबईतील सर्वात मोठी ड्रग माफिया आहे. ‘बेबी पाटणकर का इंतजार तो ग्यारह जिलों की पुलिस कर रही है… लेकिन बेबी को पकडना मुश्कील ही नही… नामुमकीन भी है…’ कारण ती कुणी साधीसुधी बाई नाहीय… तर ती आहे देशातील सर्वांत मोठी महिला ड्रग्ज तस्कर…

गेली 30 वर्ष बेबीनं अंमली पदार्थ तस्करीच्या धंद्यात घालवलीयत. या गोरखधंद्यातून तिनं करोडो रूपयांची कमाई केली. वरळीच्या सिद्धार्थ नगरातल्या बेबीचं घर म्हणजे घर नाही तर तब्बल 24 खोल्यांचा बंगला आहे. यावरून तिच्या साम्राज्याची आणि दहशतीची कल्पना तुम्हाला येऊ शकेल. म्याऊ म्याऊ नावाचा अमली पदार्थ मुंबई मध्ये सर्वात जास्त विक्री कोणी केली असेल तर ती आहे बेबी पाटणकर तिचे खरे नाव शशिकला पाटणकर हे आहे. परंतु संपूर्ण मुंबईत ड्रगच्या धंद्यातील लोक तिला बेबी नावाने ओळखतात.

दारोदारी दुध वाटणारी बेबी ८०च्या दशकात या धंद्यात आली. तिने ३० वर्षात करोडोची संपत्ती जमा केली आहे. बाकी अमली पदार्थाच्या तुलनेत म्याऊ म्याऊ या पदार्थाची किंमत अतिशय कमी आहे. लवकर पैसा कमविण्याच्या नादात तिने सुरवातीला गांजा, हशीश ब्राऊन शुगर असे पदार्थ कॉलेज समोर विकायला सुरवात केली. मध्य प्रदेश व राजस्थान पर्यंत तिचे जाळे होते येथून ती माल बोलवत असे.

बेबी पाटणकरची महाराष्ट्रातली संपत्तीच चक्रावून टाकणारी आहे. वरळी सिद्धार्थ नगर येथे २४ खोल्यांचे घर मुंबई, नवी मुंबई येथे बेनामी फ्लॅटस्र, रत्नागिरी, चिपळूण, वेंगुर्ला, सावंतवाडीत घरे आणि जागा, एक स्विफ्ट गाडी, एक टाटा मांझा गाडी, दोन टू व्हिलर आणि बेनामी महागड्या गाड्या, बेबीच्या अकाऊंटमध्ये सापडले ९७ लाख रुपये

बेबी पाटणकरचे पोलिसांशी घनिष्ठ संबंध होते. तिच्या नावाखाली अनेक वेळा पोलिसांनी कोट्यवधी रुपयांच्या अंमली पदार्थांची तस्करी केलीय. तर पोलीस दलात राहून राजकीय नेत्यांच्या खास माणसांशी जवळीक साधून, धर्मराज आणि बेबीनं अनेक अडथळे दूर करत अंमली पदार्थ तस्करी करुन मिळणाऱ्या काळ्या पैशांतून देशभरात कोट्यावधी रुपयांची संपत्ती बनवली.

आपण जो काळा व्यवसाय करतोय त्यात कधी ही आपल्याला अटक होऊ शकते हे लक्षात घेऊन धर्मराज काळोखे आणि बेबी पाटणकर यांचे कुटूंब ऐशो-आरामाचं आयुष्य जगत होते. सचिन तेंडुलकरची शेवटी मॅच असो की, आयपीएलच्या मॅच असो अगदी व्हीआयपी तिकिटांवर त्यांनी मॅच बघितल्या आहेत. शिवाय पिकनिक म्हणून देशभर भ्रमंतीदेखील केलीय.

आपल्याला हि माहिती पटल्यास अवश्य लाईक करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका..

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *