युतीची घोषणा करताना मुख्यमंत्री म्हणाले भाजप सेना मनसे सोबत! बघा काय घडलं..

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजपाची युती होणार कि नाही या खूप दिवसांपासून महाराष्ट्रातील जनतेला पडलेला प्रश्न सुटला आहे. शिवसेना-भाजपा युती करण्याचा निर्णय घेतलाय. गेल्या पाच वर्षांपासून सातत्यानं एकमेकांची उणीधुणी काढणाऱ्या शिवसेना आणि भाजपानं लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एकत्र येण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत याबद्दलची घोषणा केली.

यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपा अध्यक्ष अमित शहा, मनोहर जोशी, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि इतर प्रमुख नेते उपस्थित होते. मागील काही दिवसांपासून भाजप आणि सेनेचे संबंध खूपच ताणले होते. काही दिवसांपूर्वी मित्रपक्षाला पटक देंगे असे विधान अमित शहा यांनी केले होते. तेच भाजपा अध्यक्ष अमित शहा आज युतीसाठी मातोश्रीवर आले होते.

त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यासोबत तब्बल ५० मिनिटे चर्चा केली. शिवसेना-भाजपाच्या संयुक्त पत्रकार परिषदेत जागा वाटपाचा फॉर्म्युलादेखील जाहीर करण्यात आला. लोकसभेच्या 48 पैकी 25 जागा भाजपा लढवणार आहे. तर शिवसेना 23 जागा लढवेल. तर विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष मित्रपक्षाच्या जागा सोडून बाकीच्या निम्म्या निम्म्या जागा लढवणार आहेत.

उद्धव ठाकरे यांच्या भेटीआधी सोफिटेल हॉटेलमध्ये अमित शहांनी मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, प्रकाश जावडेकर यांच्यासह चर्चा केली. त्यानंतर ही नेते मंडळी युतीच्या चर्चेसाठी मातोश्रीवर पोहोचली. याआधी उद्धव यांनी मातोश्रीवर शिवसेनेच्या नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीला संजय राऊत, चंद्रकांत खैरे, मनोहर जोशी, एकनाथ शिंदे, दिवाकर रावते, सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.

युती झाल्यानंतर नेमकी रणनिती काय असणार, जनतेसमोर कोणते मुद्दे घेऊन जाणार, याबद्दल या दोन्ही बैठकांमध्ये चर्चा झाल्याचं समजतं. गेल्या पाच वर्षांमध्ये शिवसेनेनं सातत्यानं मोदी सरकारवर टीका केली आहे. याशिवाय स्वबळाचा नारादेखील उद्धव यांनी दिला होता, त्यामुळे आता शिवसेना मतदारांना कशी सामोरी जाणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

मुख्यमंत्री म्हणाले भाजप सेना ‘मनसे’ सोबत-

युतीची घोषणा करताना मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीला मराठीमध्ये पत्रकारांना माहिती दिली. त्यानंतर त्यांनी हिंदीमध्ये माहिती देण्यास सुरुवात केली. हिंदीमध्ये माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले “भाजप सेना मनसे साथ है”. या विधानानंतर तिथे एकच हशा पिकला. तेव्हा मुख्यमंत्र्यांना पत्रकारांनी मनसेला सोबत घेणार का असं विचारलं. मुख्यमंत्र्यांना दिलसे साथ है असं यावेळी म्हणायचं होतं.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *