यशवंतराव चव्हाणांवर आचार्य अत्रेंनी केलेल्या व्यक्तिगत टीकेचा हा किस्सा प्रत्येकाने वाचायलाच हवा..

यशवंतराव चव्हाण यांच्याबाबत एक किस्सा आहे. यशवंतराव चव्हाण यांची महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून निवड होत होती. तेव्हा त्यांच्या बद्दल प्र के अत्रे यांनी त्यांच्या मराठा दैनिकात ‘निपुत्रिक यशवंतराव चव्हाणांच्या हाती महाराष्ट्राची धुरा’ अशा प्रकारची हेडींग करून यशवंतराव चव्हाण यांच्यावर टीका केली. खासरेवर जाणून घेऊया पूर्ण किस्सा.

दुसऱ्या दिवशी यशवंतराव चव्हाण यांनी प्र के अत्रे यांना फोन केला आणि सांगितले की “अत्रे साहेब मी निपुत्रिक नाही. चले जावं चळवळीत इंग्रजांच्या विरोधात लढा देत असताना इंग्रजांनी माझ्या घरी मला पकडायला धाड टाकली त्या दरम्यान माझी पत्नी वेणू ही गरोदर होती. इंग्रजांच्या तावडीत मी सापडत नाही याचा राग त्यांनी वेणूताई च्या पोटावर लाथ मारून काढला. त्यात वेणूताई यांचा गर्भ पडला व त्यांच्या गर्भाशयाला ही हानी झालेली. त्यामुळे पुन्हा मूल होण्यास अडचण तयार झाली. यात माझी आणि वेणूताई यांची काय चूक आहे? ”

अत्रेंनी हे ऐकून त्यांना त्यांची चूक लक्षात आली. इंग्रजांनी केलेल्या अत्याचाराचे उदाहरण म्हणजे यशवंतराव याना मूल नव्हते. यात या जोडप्याची काही चुकी नव्हती.अत्रेंनी दुसऱ्या दिवशी च्या दैनिक मराठा मध्ये यशवंतराव चव्हाण यांच्याबद्दल जे काही विधान केले त्याबद्दल अत्रेंने माफी मागितली.नंतर ते यशवंतराव चव्हाण यांच्या घरी गेले आणि त्यांनी यशवंतराव चव्हाण आणि वेणूताई यांच्या पायापडून माफी मागितली.

असाच एक किस्सा आहे शालिनीताई पाटील यांनी त्यांच्या प्रचार सभेत यशवंतराव चव्हाण यांच्यावर प्रचंड टीका केली त्यात व्यक्तिगत टीका सुद्धा होती. दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी यशवंतराव चव्हाण यांची सभा होती. यशवंतराव काय बोलतात याबद्दल सर्वांना उत्सुकता होती.त्यांनी सभेत फक्त एकच वाक्य सांगितले की शालिनीताई या आमच्या वहिनी आहेत. त्यांच्या एका वाक्यात त्यांनी सभा जिंकली. शालिनीताई यांना नंतर आपली चूक समजली त्यांनी यशवंतराव चव्हाण यांची व्यक्तिगत पातळीवर घसरल्याबद्दल माफी मागितली.

त्याकाळात राजकारणात सुसंस्कृतपणा होता आजच्या पिढीत एकमेकांबद्दल पराकोटीचा द्वेष पसरला जातो आहे. नेत्यांसाठी कार्यकर्ते खालच्या पातळीवर उतरले जातात पण सुसंस्कृतपणा राजकारणात असेल तरच नेत्यांना स्वीकारले जाते हे वास्तव समजणे महत्वाचे आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *