मुकेश अंबानी फक्त पैशानेच नाही तर मनानेही आहेत श्रीमंत याचे हे उदाहरण!

जम्मू काश्मीरमधील पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफच्या ४० जवानांना वीरमरण आले. यात महाराष्ट्राच्या २ जवानांचा समावेश आहे. यामध्ये बुलडाण्याचे जवान संजय राजपूत आणि जवान नितीन राठोड शहीद झाले. जवानांच्या कुटुंबियांसोबत संपूर्ण देश उभा राहिला आहे. शहिदांच्या कुटुंबियांना सर्व स्तरातून मदतीचे हाथ पुढे येत आहेत.

शहीद जवानांना त्या त्या राज्य सरकारने आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. महाराष्ट्राच्या दोन्ही जवानांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची मदत करण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. या हल्ल्यात उत्तर प्रदेशमधील १२ जवानांना वीरमरण आले आहे. त्यांच्या कुटुंबियांना देखील प्रत्येकी २५ लाख रुपये मदतीची घोषणा केली आहे.

शहिदांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी प्रत्येक जण पुढे सरसावलाचे दिसत आहे. यामध्ये अमिताभ बच्चन यांनी देखील या हल्ल्यातील शहिदांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच विविध राज्यांनी शहिदांच्या कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरीचं आश्वासन दिलंय.

मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स फाउंडेशनची मोठी मदत-

मुकेश अंबानी यांनी शहिदांच्या कुटुंबियांना मोठी मदत जाहीर केलीये. त्यांच्या रिलायन्स फाउंडेशनने शहीद जवानांच्या मुलांच्या शिक्षणापासून ते नोकरीपर्यंतची जबाबदारी स्वीकारण्याची घोषणा केली आहे. शहिदांना मानवंदना म्हणून हा निर्णय घेतल्याचे सांगितले.

एवढेच नाही तर ज्यांना उपचाराची गरज आहे अशांना त्यांच्या रुग्णालयात मोफत उपचार दिले जातील असेही सांगितले आहे. रिलायन्सने यासंबंधी एक परिपत्रक जारी केले आहे. नीता अंबानी चेअरमन असलेल्या रिलायन्सच्या माध्यमातून नेहमीच वेगवेगळे सामाजिक उपक्रम चालू असतात.

शहीद जवानांना केलेल्या या मोठ्या मदतीच्या घोषणेमुळे सोशल मीडियावर मुकेश अंबानी हे फक्त पैशानेच नाही तर मनानेही श्रीमंत असल्याच्या भावना काहींनी व्यक्त केल्या आहेत.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

1 comment

  1. Similar help was given by then Dhirubhai Ambani Foundation for the children of martyrs of Kargil war.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *