पाकिस्तानात जाऊन हल्ला करण्याची मला परावनगी द्या! मोदींना माजी सैनिकाचे खुले पत्र..

पुलवामा येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या विविध माध्यमातून निषेध सुरु आहे. खासकरून सोशल मीडियावर तीव्र भावना व्यक्त केल्या जात आहेत. या हल्ल्यानंतर अनेक सैनिकांचे तीव्र संताप व्यक्त केलेले अनेक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. काही सामान्य नागरिकांनी तर पाकिस्तानमध्ये घुसण्याची संध्या द्या स्वतः सुसाईड बॉम्बर बनून जाण्याचे सांगितले.

पण या सर्व गोष्टी भावनिक आहेत. युद्ध करा, पाकिस्तानला संपवून टाका या गोष्टी अनेकजण भावनिक होऊन बोलून जातात. पण खरं बघायला गेलं तर त्या करणं एवढं सोपं देखील नसतं.

या सर्व गोष्टी चालू असताना महाराष्ट्रातील एका माजी सैनिकाने मोदींना पत्र लिहून पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला करण्याची मागणी केली आहे. हे पात्र लिहिणारे माजी सैनिक आहेत कुशल महादेव घुले आहेत. कुशल घुले हे बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील रहिवाशी आहेत.

घुले यांनी १७ वर्षे सैन्यात सेवा केल्याचे त्यांनी या पत्रात म्हंटले आहे. त्यांनी संतापात लिहिलेले हे पत्र सोशल मीडियावर खूप व्हायरल झालं आहे. खाली वाचा त्याने खुले पत्र.

कुशल घुले यांच्या हिंदी पत्राचा मराठी अनुवाद-

प्रति,
नरेंद्र मोदी,
पंतप्रधान भारत सरकार

विषय- पाकिस्तानमध्ये जाऊन आत्मघाती हल्ला करण्याची परवानगी देणे बाबत.

मोदीजी, मी कुशल महादेव घुले (माजी सैनिक). मी 17 वर्षे सैन्यात देशसेवा केली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये सैनिकांना कसं जगावं लागतं, याची मला चांगली माहिती आहे. पाकिस्तानने 14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामात केलेल्या हल्ल्याला स्फोटकांनीच उत्तर द्यावे लागेल. पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुनच हटवावे लागेल. तरच भारत देश आनंदाने राहू शकतो. आता ती वेळही आली आहे. तुमच्यावर संपूर्ण देशाचा विश्वास आणि गर्व आहे, की तुम्ही पुलवामा हल्ल्याचा बदला नक्की घ्याल. सर्व राजकीय पक्षांना विनंती करतो की, देशाच्या सुरक्षेसाठी आणि पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी मोदींना साथ द्यावी.

मोदीजी, तुम्हाला विनंती करतो की, पाकिस्तानात जाऊन हल्ला करण्याची मला परावनगी दिल्यास, मी पाकिस्तानात जायला तयार आहे.

आपलाच माजी सैनिक

कुशल महादेव घुले
मो नंबर ७३८५१३०००१

मोदींना पाठवलेले पत्र-

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *