शहीद होण्याच्या काही क्षणापूर्वी त्याने फोनवर कॉल केला होता आणि हि विचारपूस केली…

पुलवामा दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण भारत देश हादरून निघाला आहे. आणि त्यामध्ये शहीद झालेल्या जवानांचा परिचय होत आहे. परंतु त्यांचे आयुष्य हे चित्रपटातील कथानका प्रमाणे आहेच आज असेच काही शहीद जवानांच्या गोष्टी आपण खासरे वर माहिती करून घेणार आहोत. यामध्येच सुखजिंदर सिंग हे ‘सीआरपीएफ’च्या 76व्या बटालियनमध्ये कॉन्स्टेबल पदावर कार्यरत होते.

सुखजिंदर सिंग पंजाबमधील तरणतारण येथील गंडीविंड धत्तल गावाचे रहिवासी होते. नुकतेच घरी ते सुट्टीवर आले होते आणि आपल्या परिवारासोबत काही काळ थांबून तो परत ड्युटीवर गेला होता. सुखजिंदर सिंग यांना लहान ८ महिन्याचा मुलगा होता त्यामुळे या वेळेस जाताना त्यांचे मन काही लागत नव्हते. अचानकच येऊन तो बाळाला जवळ घ्यायचा आणि त्याचे लाड करायचा.

एक महिन्याच्या सुट्टीनंतर ते 28 जानेवारी रोजी पुन्हा आपल्या कर्तव्यावर रूजू झाले होते. सुखजिंदर सिंघ हा आपला भाऊ गुरजंट सिंग जंटा यांच्या सोबत नेहमी सम्पर्कात असे. हल्याची दिवशी सुध्दा त्याने सकाळी १०:३० च्या सुमारास आपल्या भावाला संपर्क केला आणि तो घरातील सर्वाची माहिती विचारत होता. जम्मू मधील समस्या तो आपल्या भावाला सांगत होता.

‘जम्मू काश्मीरमधील रस्ते काही दिवस बंद असल्यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. मात्र, दुरुस्तीनंतर येथील रस्ता वाहतुकीसाठी मोकळा झाला आहे.’ असा तो भावाला बोलला आणि नंतर अचानकच काय त्याच्या मनात आले आणि त्याने विचारले माझा मुलगा रडत तर नाहीय ना?, तो ठीक आहे ना? पुढे सांगितले कि या वेळेस परत येताना भरपूर खेळणे घेऊन येणार आहो.

त्यानंतर त्याच दिवशी भाऊ टीव्ही बघत असताना घरच्यांना समजल कि पुलवामा येथे दहशतवाडी हल्ला झाला आहे आणि त्यानंतर सुखजिंदर यांच्या सोबत संपर्क केल्यावर कळले कि सुखजिंदर शहीद झाले आहे. मुलगा देशासाठी हुतात्मा झाला याचा अभिमान आहे असे त्यांच्या परिवारातील लोकांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

आपल्याला हि माहिती पटल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपले लेख आपण आम्हाला info@Khaasre.com या इमेल आयडीवर पाठवू शकता. योग्य ते लेख प्रसिद्ध करण्यात येतील.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *