पुलवामा हल्यातील शहीद संजय राजपूत यांचा हा निर्णय वाचून छाती अभिमानाने भरून येईल..

पुलवामा दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण भारत देश हादरून निघाला आहे. आणि त्यामध्ये शहीद झालेल्या जवानांचा परिचय होत आहे. परंतु त्यांचे आयुष्य हे चित्रपटातील कथानका प्रमाणे आहेच आज असेच काही शहीद जवानांच्या गोष्टी आपण खासरे वर माहिती करून घेणार आहोत. यामध्येच बुलडाणा जिल्ह्यातील संजय राजपूत या जवानाला दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात आपला जीव गमवावा लागला.

परंतु संजय राजपूत यांची पडद्या मागील गोष्ट आज कळल्यावर डोळ्यात पाणी आल्या शिवाय राहणार नाही. संजय राजपूत बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर इथले आहेत. पत्नी व दोन छोटे चिमुकले असा त्यांचा संसार आहे. संजय आपल्या स्वभावामुळे सर्व मित्रात नेहमी प्रिय होता. लहानपणापासून त्यांना देशसेवेची आवड होती. त्यामुळे सैन्यात जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता.

तर संजय राजपूत हे १९९६ ला सैन्यात भरती झाले आणि सेनेच्या करारानुसार त्यांच्या सेवेची २० वर्ष २०१६ला पूर्ण झाली होती. परंतु देशसेवा हि नसानसात भिनली असल्यामुळे त्यांना भारत मातेचे सरंक्षण करण्यापासून दूर जायचे नव्हते. म्हणून त्यांनी विशेष विनंती करून आपला सेवाकाळ ५ वर्षांनी वाढवून घेतला. पेन्शन घेऊन निवांत आयुष्य जगणे या जवानाच्या रक्तात नव्हते.

परंतु नियतीला हे मान्य नव्हते आणि हा कार्यकाळ संपण्याला 2 वर्ष उरली असतानाच दहशतवाद्यांच्या हल्ल्यात संजय राजपूत यांनी आपले प्राण गमावले. देशसेवेसाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे संजय राजपूत यांचा महाराष्ट्रातील नाहीतर देशातील सर्वांना अभिमान असणार हे नक्की आहे. हा हल्ला जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

लवकरच यांचा बदला घेण्यात येईल अशी प्रत्येक नागरिकाची इच्छा आहे. आपल्याला हि माहिती पटल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपले लेख आपण आम्हाला info@Khaasre.com या इमेल आयडीवर पाठवू शकता. योग्य ते लेख प्रसिद्ध करण्यात येतील.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *