शहिद जवानांना अशाप्रकारे तुम्हीही करू शकता मदत..

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहीद झाले आहेत. यामुळे देशभर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रत्येकांच्या मनात दहशतवादी व पाकिस्तान बद्दल राग निर्माण झाला आहे. तसेच जे आपले भावंड शहीद झालेत त्यांना आपण हि थोडीफार आर्थिक मदत करावी अशी भावना अनेकांच्या मनात आहे. तर आपण पाहूया शहिदांच्या कुटुंबीयांपर्यंत मदत पोहचवणाऱ्या फ्लॅटफॉर्म बद्दल..

यात ऑनलाइन व ऑफलाईन पद्धतीने आपल्याला आपली मदत भारतीय शहीद जवानांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहचवता येईल. ऑनलाईन पद्धतीने पैसे पाठवण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत त्यातील काही सोपे पर्याय आपण पाहूया.

bharatkeveer.gov.in या वेबसाईट च्या माध्यमातून आपल्याला जेवढी मदत करायची तेवढी मदत आपण करू शकता हि वेबसाईट भारत सरकारची आहे या साईट वर आपल्याला शहिदांच्या कुटुंबियांना मदत करता येते.यात आपल्याला ठराविक एका जवानाला मदत करायची असेल तर त्याला हि करू शकता. सध्या या वेबसाईट वर देशात जे सैनिक शहीद होतात त्यांची माहिती देण्यात येते. या साईट वर आपण नेट बँकिंग आणि कार्ड द्वारे पेमेंट करू शकतो. सध्या या वेबसाईटवर प्रचंड ट्राफिक झाल्याने हि साईट सारखी क्रश होत आहे.आपण या साईट वरून डोनेशन दिल्यावर आपल्याला इन्कम टॅक्स मध्ये सवलत हि मिळते.

पेटीएम या अँप वरून हि आपल्याला अत्यंत सोप्या पद्धतीने शहीदांसाठी पैसे पाठवता येतील. आपल्या मोबाईल मध्ये पेटीएम अँप असेल तर ते ओपन करून त्यामध्ये आपल्याला CRPF Bravehearts नावाचे ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करून आपण आपले नाव पॅन कार्ड नंबर टाकून जेवढे पैसे आपल्याला दान द्यायचे आहेत तेव्हढे दान करू शकता.

भारत सरकारने National Defence Fund साठी स्वतंत्र वेबसाईट काढली आहे. https://ndf.gov.in/ या वेबसाईट वरून एकत्रित झालेला निधी राष्ट्रीय सुरक्षा निधी करिता जातो. या निधीच्या माध्यमातून सैन्यासाठी सरकार अनेक उपक्रम राबवित असते.

आपण बँक च्या माध्यमातून डीडी काढून सैन्यासाठी पैसे पाठवू शकता यासाठी “Army Welfare Fund Battle Casualties” या नावाने डीडी काढून तो Syndicate Bank मार्फत माहिती सह IFSC: SYNB0009055; Account No.: 90552010165915 देऊ शकता.

तसेच शासकीय कार्यलयाच्या माध्यमातून हि आपण सैन्यासाठी डोनेशन देऊ शकतो. यासाठी तहसीलदार व जिल्हाधिकारी यांच्या मार्फत हि आपण शहीदांसाठी निधी दान करू शकता.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *