पुलवामा हल्यातील शहीद रोहीताश लांब यांचे दुर्देव , नक्की वाचा काय घडले..

पुलवामा दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण भारत देश हादरून निघाला आहे. आणि त्यामध्ये शहीद झालेल्या जवानांचा परिचय होत आहे. परंतु त्यांचे आयुष्य हे चित्रपटातील कथानका प्रमाणे आहेच आज असेच काही शहीद जवानांच्या गोष्टी आपण खासरे वर माहिती करून घेणार आहोत. यामध्येच राजस्थान येथील रोहीताश यांचा समावेश आहे.

रोहिताश लांब यांचा जन्म 14 जून 1991 रोजी गोविंदपूर येथील बासडी गावात झाला. आपले १२वी पर्यंत चे सर्व शिक्षण त्यांनी श्याम बाल मंदिर येथे पूर्ण केले. चिमणपुरा येथील सरकारी महाविद्यालयातून त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर २०११ साली सीआरपीएफ मध्ये त्यांची निवड झाली होती. ५ -६ हजार लोकसंख्या असलेले गाव गोविंदपूर येथील लोक त्यांचा अभिमान बाळगतात.

रोहीतांश याचे लग्न मागील वर्षीच झाले होते. आणि काही दिवसापूर्वीच त्यांना मुलगी देखील झाली होती. परंतु दुर्देव असे कि त्यांना मुलीला बघायला देखील मिळाले नाही. तिला बघण्यासाठी त्यांनी या होळीला सुट्टीचा अर्ज देखील केला होता. रोहीतांश ने आपल्या मुलीचे नाव लाडाने प्रिन्सेस ठेवले होते आणि फेसबुक पोस्ट देखील त्यांनी केली होती.

या अगोदर त्यांचा भाऊ जितु लांब याला देखील मुलगी झाली तिला देखील रोहीतांश ला बघता आले नाही. हिंदीत एक कविता आहे “किसी गजरे की खुशबू को महकता छोड़ कर आया हूं। एक नन्हीं सी चिड़िया को चहकता छोड़ कर आया हूं। मुझको अपनी छाती से लगा ले हे भारत मां मैं अपनी मां की तरसती बाहों को छोड़कर आया हूं। ”

त्यांच्या आयुष्या सोबत अगदी मिळती जुळती आहे. आपल्या मुलीला न बघता आल्याने हा बाप भारत मातेसाठी शहीद झाला. आपल्याला हि माहिती पटल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपले लेख आपण आम्हाला info@Khaasre.com या इमेल आयडीवर पाठवू शकता. योग्य ते लेख प्रसिद्ध करण्यात येतील.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *