हुतात्मा नितीन राठोड यांनी काही दिवसांअगोदर बनवलेले हे २ व्हिडीओ ठरले शेवटचे..

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहीद झाले आहेत. यामुळे देशभर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या भ्याड हल्ल्यात बुलढाणा जिल्ह्यातील 2 जवान शहीद झाले आहेत. शहीद नितीन राठोड यांच्या जाण्याने बीबी नजीक गोवर्धन नगर शोकसागरात बुडालं आहे. हुतात्मा नितीन राठोड यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

आठवडाभरापूर्वी नितीन यांची जम्मू-काश्मीरमध्ये नियुक्ती झाली होती. त्यानुसार ते १२ फेब्रुवारी रोजी आपली सुटी संपवून नागपूर येथून निघाले होते. नितीन राठोड यांनी स्फोटाच्या काही तासांपूर्वी पत्नीशी फोनवरून संवाद साधून आपल्या आजारी मुलाच्या तब्येतीची विचारपूस केली होती.

स्फोट होण्याच्या काही तासांपूर्वी त्यांनी बर्फाळ प्रदेशातील सेल्फी काढून परिवाराला पाठविला होता. राठोड काश्मिरातील नैसर्गिक सौंदर्याचे अनेक फोटो काढून मुलगा पीयूष आणि मुलगी प्राची यांना पाठवित असत.

त्यांचे टिकटॉक या अँपवर बनवलेले दोन व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. देशभक्तीवर बनवकलेले हे दोन व्हिडीओ त्यांचे शेवटचे ठरले आहेत.

हुतात्मा नितीन राठोड यांचे हे व्हिडीओ बघून तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. बघा व्हिडीओ-

येथे बघा दुसरा व्हिडीओ-

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *