१६ वर्षानंतर झाले होते बाळ, हे होते शहीद जैमल सिंग यांचे शेवटचे शब्द..

पुलवामा दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण भारत देश हादरून निघाला आहे. आणि त्यामध्ये शहीद झालेल्या जवानांचा परिचय होत आहे. परंतु त्यांचे आयुष्य हे चित्रपटातील कथानका प्रमाणे आहेच आज असेच काही शहीद जवानांच्या गोष्टी आपण खासरे वर माहिती करून घेणार आहोत. यामध्येच पंजाब मधील गाव गलोटी जिल्हा मोगाचे सुपुत्र जमैल सिंग हे होते.

जमैल सिंग याच्या पाठीमागे वडील जसवंत सिंग आणि पत्नी सुखजीत कौर आणि एक लहान मुलगा आहे. जमैल सिंग ७६ बटालियनचे सैनिक ते सीआरपीएफ १९९३ मध्ये भरती झाले होते. त्यांच्या जाण्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. परंतु शहीद होण्या अगोदर जमैल सिंग यांनी सांगितलेले शेवटचे शब्द मनाला भिडून जातात.

त्यांचा ५ वर्षाचा मुलगा वडीला सोबत बोललेले शेवटचे शब्द ऐकताना अंगावर काटा येतो. जमैल सिंग यांना लग्नानंतर १६ वर्षांनी मुलबाळ झाले होते त्यांच्या मुलाचे नाव गुरप्रकाश हे आहे. तो सांगतो कि हल्याच्या वेळेस तो वडिला सोबत फोनवर बोलत होता. जमैल सिंग याने आपल्या चिमुकल्यास सांगितले कि इथे ट्राफिक खूप आहे आवाज येत नाही आपण नंतर बोलू आणि अचानकच बाबाचा आवाज बंद झाला.

जमैल सिंग यांची पत्नी सुख्जीत कौर यांनी सांगितले कि त्यांना हल्याच्या वेळेस फोन आला होता आवाज खूप असल्याने सायंकाळी बोलू असे ते बोलले आणि थोड्या वेळाने टीव्हीवर हि बातमी याला लागली. त्यानंतर संपर्क केल्यास संपर्क होत नव्हता आणि काही काळाने कळले कि जमैल सिंग शहीद झाले आहे. जमैल त्या दिवशी ड्रायव्हर होते युनिट दुसर्या ठिकाणी जाताना ते स्वतः गाडी चालवत होते.

जमैल सिंग यांच्या जाण्याने गावावर शोककळा पसरली आहे. जमैल सिंग यांचा जन्म २६ एप्रिल १९७४ आहे.१५ दिवस अगोदरच ते सुट्टीवरून परत ड्युटीवर गेले होते. आपल्याला हि माहिती पटल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपले लेख आपण आम्हाला info@Khaasre.com या इमेल आयडीवर पाठवू शकता. योग्य ते लेख प्रसिद्ध करण्यात येतील.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *