या क्रिकेटपटूने घेतली पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी..

पुलावामा दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. जम्मू-काश्मीरमधील पुलवामा (Pulwama Attack) जिल्ह्यात गुरुवारी (१४ फेब्रुवारी) मोठा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात CRPF चे जवळपास ४० जवान शहीद झाले आहेत. महाराष्ट्राच्या बुलडाण्यातील दोन जवानांचाही यामध्ये समावेश आहे.

या भ्याड हल्ल्याचा जगभरातून निषेध करण्यात येत आहे. भारतात देखील विविध ठिकाणी निषेध रॅली काढण्यात येत आहेत. बॉलिवूड कलाकारांसह क्रिकेटपटू, साहित्यिक अशा विविध क्षेत्रातील दिग्गजांनी शहिदांना आदरांजली वाहिली.

मागील काही वर्षांमध्ये झालेला हा सर्वात मोठा हल्ला आहे. यापूर्वी उरीमध्ये असाच भ्याड हल्ला झाला होता. या हल्ल्यामुळे संपूर्ण देशासह जवानांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. जवानांच्या कुटुंबाना अनेक स्थरातून मदत मिळत आहे. त्यात आता भारताचा माजी क्रिकेटपटू समोर आला असून त्याने शहिदांच्या मुलांची शिक्षण पूर्ण होईपर्यंत शैक्षणिक जबाबदारी स्वीकारली आहे.

क्रिकेटपटू गौतम गंभीरने पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या मुलांची शैक्षणिक जबाबदारी स्वीकारली आहे. गौतम गंभीर फाउंडेशनच्या माध्यमातून त्याने यापूर्वीही अनेकदा शहिदांच्या कुटुंबियांना अशाचप्रकारे मदत केली आहे.

२०१७ मध्ये छत्तीसगढ येथील सुकमा मध्ये झालेल्या नक्षली हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या मुलांची शैक्षणिक जबाबदारी देखील गौतम गंभीर फाउंडेशनने स्वीकारली होती. या हल्ल्यात CRPF चे २५ जवान शहीद झाले होते. शहिदांच्या घरी जाऊन त्यांचे बँक डिटेल्स घेऊन पुढे मदत केली जाते. या फाउंडेशनचे मॅनेजर गौरव अरोडा हे काम बघतात.

गंभीरने या हल्ल्यानंतर संताप व्यक्त केला आहे. गंभीरने ट्विट करुन म्हंटले आहे कि, “फुटीरतावाद्यांशी चर्चा करतो, पाकिस्तानशी चर्चा करतो, मात्र आता ही बातचीत टेबलवर नको, युद्धभूमीत व्हायला हवी. आता सहनशक्ती संपली आहे”

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *