काश्मीरात शहीद झालेल्या प्रत्येक जवानाच्या घरची परिस्थिती या घडीला कशी आहे सांगणारा प्रसंग..

पहाटे झोपेत असताना काशमीरात तैनात असलेल्या “मराठा लाईट इन्फन्टरी” मधील एका मित्राचा फोन येतो. २० तास ड्युटी करून त्याचा आवाज कमालीचा थकलेला दबलेला असतो. माझा जीव कातरून जातो…

तो म्हणतो- मंग्या घरी फोन कर रं माझ्या, बायको दोन बारकी लेकरं कुणीच कशी फोन उचलनायती..??. आता ड्युटी संपली माझी पहाटेपासणं फोन करतोय… फक्त रिंग येतीय…

मी पुण्यावरनं त्याच्या घरी फोन करतो, पण 12-13 वेळात एकदाही फोन उचलला जात नाही… काळजी वाटायला लागते… मग गावाकडच्या एका मित्राला फोन करून त्याच्या घरी जाऊन यायला सांगतो. अंधारात चाचपडत तो त्याच्या घरी पोचतो. कित्येक वेळा बेल वाजवूनही दार उघडलं जात नाही. परत मी त्याच्या घरी फोन करतो. 8 व्या वेळेला यावेळी फोन उचलला जातो, पलीकडून वाहिनीचा घाबरलेला (कधीपासून) रडत असलेला आवाज येतो.

थोडासा चिडलेला मी विचारतो – फोन का उचलत नव्हता वहिनी ? वहिनी रडायला लागतात जोरात! बांध फोडतात… कानात रडायचा जोरात अन विचित्र आवाज घुमायला लागतो.

ते ऐकून, त्यांचा झालेला अवतार मला डोळ्यासमोर स्पष्ट, स्पष्ट दिसायला लागतो. तोंडा नाकातून गळत असलेली त्यांची लाळ माझ्या 200 किलोमीटर दूर असलेल्या हातावर पडायला लागते ओघळायला लागते..! शेवटी रडत-रडत त्या एवढंच म्हणू शकतात, फोन उचलायला भीती वाटतेय हो भैय्या आता… जीव फाटत चाललाय हळूहळू माझा..

मित्र मैत्रिणींनो… तुम्ही आता जेवत असाल, सहज दिवसभराच्या बातम्या पहात असाल, किंवा आजचा दिवस हसत साजरा करत असाल, आई वडिलांशी निवांत गप्पा मारत असाल, आपल्या पोरांसोबत खेळत असाल, किंवा उद्या परवा पिच्चरला जायचा प्लॅन करत असाल. चांगलंच आहे ते नक्कीच…

माझी काहीच हरकत नाही. फक्त एवढंच सांगायचं होतं की त्या काल काश्मीरात शहीद झालेल्या प्रत्येक जवानाच्या घरची परिस्थिती आज या घडीला ही अशी आहे. असे दोन हजार पाचशे सत्तेचाळीस सैनिकांच्या घरचे फोन सध्या जोरर,जोरात खणखणतायत.

पण ते उचलायची हिम्मत?

पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली.

1 comment

  1. Jay hind ..Aye mere Watan ke logo Zara aankh mein Bharlo paani Jo shaheed hue hai unki zara yaad Karo qurbani

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *