कडी निंदा नको धडा शिकवा! सोशल मीडियावरील स्वतःच्या पोस्टवर मोदींना सुनावले खडे बोल..

सोशल मीडियावर नरेंद्र मोदी हे नेहमी सक्रिय असतात. आता पर्यंत त्यांच्या पोस्टला देशातील नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद राहिलेला आहे. आज त्यांनी जम्मू काश्मीरमधील पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करणारी पोस्ट केली त्यावर हजारो लोकांनी कॉमेन्टच्या माध्यमातून गुजरात मध्ये मुख्यमंत्री असतानाच्या वक्तव्याची आठवण करून दिली. कडी निंदा नको पाकिस्थान ला धडा शिकवा अशी लोकांनी भावना व्यक्त केली.

नरेंद्र मोदी यांनी आपल्या फेसबुक पेज व ट्विटरवर वर इंग्लिश मध्ये पुढील प्रमाणे पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे. “Attack on CRPF personnel in Pulwama is despicable. I strongly condemn this dastardly attack. The sacrifices of our brave security personnel shall not go in vain. The entire nation stands shoulder to shoulder with the families of the brave martyrs. May the injured recover quickly.”- Narendra Modi त्यांची हि कडी निंदा देशातील नागरिकांना काही रुचली नाही.

मोठ्या संख्येने लोक कॉमेंट करत होते कि तुम्ही निंदा करण्याऐवजी पाकिस्तानला त्याच्या भाषेत धडा शिकवा. आम्ही तुम्हाला निंदा करायला म्हणून निवडून दिले नाही. आपण पाकिस्तान विरोधात कडक कार्यवाही करावी यासाठी निवडून दिले आहे. अनेकांनी पाकिस्तान चा सुपडा साफ केल्याशिवाय तुम्ही आम्हाला तोंड दाखवू नका अशा प्रकारच्या हि कॉमेंट केल्या आहेत.

२०१९ मध्ये निवडून येण्यासाठी आपण साडे चार वर्षात काय केले हे आम्ही पाहणार नाही आता पाकिस्तानला कसा धडा शिकवाल हे पाहून मतदान करणार अशा प्रकारच्या अनेक कॉमेंट्स होत्या.

एकूण नरेंद्र मोदी याना त्यांच्या स्वतःच्या फेसबुक ट्विटर अकाउंटवर देशातील नागरिकांनी प्रथमच ट्रोल केले आहे. यातून देशातील नागरिकांच्या भावना अत्यंत तीव्र आहेत हे दिसून येते. नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तान ला ताबडतोब धडा शिकवावा हि देशातील नागरिकांसोबत आमची हि भावना आहे..

गुजरात मध्ये मुख्यमंत्री असतानाच्या या वक्तव्याची अनेकांनी करून दिली आठवण-

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *