पुलवामा हल्ल्यात महाराष्ट्राच्या या दोन सुपुत्रांना आले वीरमरण..

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा इथं सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर झालेल्या हल्लात ४४ जवान शहीद झाले आहेत. हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पुलवामा येथील अवंतीपोरा येथील गोरीपोरा सीआरपीएफच्या ताफ्यावर IEDद्वारे हल्ला केला.

जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली आहे. या घटनेनंतर पुलवामा येथे असलेल्या सर्व जवानांना, राज्य पोलीस दल आणि सीआरपीएफच्या अन्य तुकड्यांना अवंतिपोरा येथे पाठवण्यात आले आहे. या घटनेनंतर जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला. तसेच परिसरात सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आले आहे.

राज्यातील पुलवामा, शोपियां, कुलग्राम आणि श्रीनगर जिल्ह्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. काश्मीरमधील हा गेल्या तीस वर्षांतला सर्वात मोठा मानला जात आहे. या हल्ल्यात लष्कराच्या एक डझनहून अधिक वाहनांवर हल्ला करण्यात येणार असल्याचे जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या अधिकृत व्यक्तीकडून सांगण्यात आले.

या भ्याड हल्ल्यात ५० हून अधिक वाहनांच्या ताफ्याला लक्ष्य करण्यात आले. या ताफ्यात CRPF चे २५४७ जवान होते. अगोदर ताफ्यावर एका दहशतवाद्याने हा आत्मघाती हल्ला केला. यानंतर दहशतवाद्यांनी ताफ्यावर अंदाधुंद गोळीबार केला. यात आतापर्यंत ४४ जवान शहीद झाले आहेत तर अनेक जवान गंभीर जखमी झाले आहेत.

महाराष्ट्राच्या दोन सुपुत्रांना वीरमरण-

पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील २ सुपुत्रांनाही वीरमरण आलंय. या शहिदांमध्ये संजय राजपूत आणि नितीन राठोड या महाराष्ट्रातील दोन सुपुत्रांचा समावेश आहे.

दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले जवान संजय राजपूत हे मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर इथले आहेत. तर शहीद नितीन राठोड हे बुलढाण्यातीलच लोणार तालुक्यातील आहेत. या जवानांच्या मृत्यूची बातमी आल्यानंतर त्यांच्या गावी मोठा आक्रोश करण्यात आला.

हा हल्ला आदिल अहमद दर उर्फ वकास या दहशतवाद्याने केला आहे. त्याने सुसाईड बॉम्बर बनून जवानांच्या ताफ्यात त्याची गाडी घुसवली. त्या गाडीमध्ये २०० किलोंपेक्षा अधिक स्फोटकं होती. आदिल दर हा जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी होता. तो २०१६ नंतर या संघनतेत भरती झाला होता.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *