भारताचा पाकिस्तानवर पहिला वार! मोस्ट फेव्हर्ड नेशनचा दर्जा काढला..

पुलवामा येथील हल्ल्यात ४४ भारतीय जवान शहीद झाल्यानंतर त्याचे पडसाद देशभर उमटत आहेत. भारतीय नागरिकांच्या मनात सध्या असंतोष तयार झाला आहे. दहशतवादी हल्ल्यामुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर हि पाकिस्तान ला धडा शिकवण्यासाठी दबाव वाढला आहे.

आज सकाळी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या महत्त्वाच्या बैठकीनंतर पाकिस्तानविरुद्ध पहिलं मोठं पाऊल उचललं आहे. व्यापार उद्योगात पाकिस्तानला दिलेला ‘मोस्ट फेवर्ड नेशन’चा दर्जा काढण्याचा निर्णय कॅबिनेट कमिटी ऑफ सिक्युरिटीच्या (सीसीएस) बैठकीत घेण्यात आला.

एमएफएन म्हणजेच मोस्‍ट फेवर्ड नेशनचा दर्जा मिळणाऱ्या देशाला व्यापाराबाबत सुविधा मिळतात. मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा मिळणाऱ्या देशाला या गोष्टीची खात्री असते की, त्याला व्यापाऱ्यात कोणतंही नुकसान होणार नाही. मोस्ट फेवर्ड नेशनच्या नियमानुसार, कोणताही देश विविध देशांमधील व्यापारासंबंधी करारात भेदभाव करु शकत नाही.

एमएफएनच्या नियमाअंतर्गत दोन्ही देशांना आंतरराष्ट्रीय व्यापार नियमांचं पालन करणं गरजेचं असतं. याचा अर्थ आहे की, व्यापारात मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा मिळालेला देश, दुसऱ्या देशाच्या तुलनेत तोट्यात राहणार नाही.

१९९६ साली भारताने एमएफएन चा दर्जा पाकिस्तान ला दिला होता पण पाकिस्तान ने आज पर्यंत आपल्याला तो दर्जा दिला नाही. भारतीय शेतकरी वर्ग पाकिस्तान मधून आयात करणाऱ्या वास्तूच्या विरोधात होता. आपल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुद्धा पाकिस्तान कडून कांदा साखर यांची आयात भारतीय शेतकऱ्यांच्या विरोधाला डावलून केली होती. या निर्णयाचा भारतीय शेतकऱ्यांना फायदा होईल पण त्यासाठी ४४ जवान शहीद व्हावे लागले हे अत्यंत दुःखद आहे. हे जवान हि शेतकऱ्यांची मुलेच असतात.

हा दर्जा काढून पाकिस्तान ला कडक प्रतिउत्तर ठरत नाही. चोख लष्करी कार्यवाही करावी हि देशातील जनतेची मागणी आहे. भारतीय शेतकऱ्यांच्या शेतीमालाला चांगला भाव देण्याऐवजी पाकिस्तानी शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव देण्याची कृती आता पर्यंत सरकार करत आले आहे यापुढे सरकारने कोणतीही वस्तू पाकिस्तान कडून आयात करू नये हीच आपल्या जवानांसाठी श्रद्धांजली ठरेल.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *