विलासराव-आबा २६/११च्या हल्ल्यानंतरची मिडिया आणि फडणवीस-उद्धव पुलवामा हल्ल्यानंतरची मिडिया

जम्मू काश्मीर मधील पुलवामा येथे काल आपल्या जवानांवर मोठा दहशतवादी हल्ला झाला. संपूर्ण देश दुःखात बुडालेला असताना महाराष्ट्रात मात्र वेगळेच राजकारण सुरु होते. खरं तर हि वेळ राजकारण करायची नव्हती पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील हे मातोश्रीवर जाऊन युतीच्या चर्चेत व्यस्त राहिले. कालची त्यांची कृती सामान्य जनतेला अजिबात पटली नाही. २६ ११ मुंबई हल्ल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी राजीनामा दिला होता.

२६ ११ मुंबई हल्ल्यानंतर विलासराव देशमुख हे घटनास्थळी गेले होते तेव्हा त्यांच्या सोबत फिल्म निर्माता राम गोपाळ वर्मा हि उपस्थित होता त्यामुळे मीडियातून विलासराव देशमुखांना प्रचंड टार्गेट करण्यात आले.याच वेळी आर आर पाटील हे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री म्हणून कार्यरत होते.आबा पाटील हे हिंदी वृत्तवाहिन्याला बाईट देताना हिंदीतील त्यांच्या बाईटमुळे वेगळाच गैरसमज झाला आणि आबा पाटील यांना हि मीडियाने धारेवर धरले.लोकांत हि विलासराव आणि आबा यांच्या विषयी रोष तयार झाला.

जनसमुदायाच्या भावनांचा विचार करून तेव्हा विलासराव देशमुख यांनी आपला राजीनामा दिला तो पक्षश्रेष्टींने सुद्धा मंजूर केला. आबा पाटील यांच्या छोटे छोटे शहरो मे वाल्या डायलॉग मुळे बळी जाऊन त्यांना हि राजीनामा द्यावा लागला.हिंदी भाषेमुळे एखादया व्यक्तीचे पद जाईल याचे ते उदाहरण ठरले. या दोन्ही व्यक्ती आज आपल्यात नाहीत पण त्या उतुंग होत्या हे आज लक्षात येते.

फक्त आणि फक्त मीडिया ट्रायल मुळे त्यांचा बळी गेला. त्यांनीही भावनेचा आदर केला.आणि आपल्या पदाला चिटकून न राहता त्याचा त्याग केला. आता काल आपण महाराष्टात पाहत असालच देशात एवढा मोठा हल्ला झाल्यावर आपल्या नेत्यांना कशाचं पडलं तर त्यांना पडले ते युती होईल कि नाही याचे. भाजप शिवसेनेची रात्री युती संदर्भात बैठक सुरु होत्या देवेंद्र फडणवीस चंद्रकांत पाटील हे स्वतःला राष्ट्रप्रेमी म्हणून घेणारे मातोश्री वर शिवसेनेची मनधरणी करण्यात मुशगुल होते.

स्वतःला कडवे राष्ट्रभक्त हिंदुत्ववादी म्हणवणारी शिवसेना सुद्धा रात्री युती युती खेळत बसले. यांची युती झाली नसती तर देशावर कोणते मोठे संकटच येणार होते असा त्यांचा अभिर्भाव… पण एक गोष्ट लक्षात घेतली का काल मीडिया भाजप शिवसेनेच्या या खेळात सामील होता त्यांच्या बातम्या देत होता. आणि लोक मात्र संतापले होते. युतीच्या बातम्यांवर लोकांनाच संताप ओसंडून वाहत होता. पण या दोन्ही पक्षातील नेत्यांना देश न जनभावना महत्वाची होती फक्त आणि फक्त युती महत्वाची वाटली. काल पुन्हा विलासराव आणि आबा पाटील यांची आठवण झाली. ज्या दोन नेत्यांनी लोकांची भावना लक्षात घेऊन पद त्याग केलेला.

आपल्याला हि माहिती पटल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपले लेख आम्हाला तुम्ही info@khaasre.com या इमेल आयडी वर पाठवू शकता. धन्यवाद !

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *