पाकिस्तानच्या राजकारणातील सौंदर्याच्या मलिका…

सौंदर्याकरिता पाकिस्तान हे पहिले पासून प्रसिद्ध आहे. आजही पाकिस्तानमधील अनेक मॉडेल बाहेर देशात जाऊन नाव कमवितात परंतु पाकिस्तानमध्ये त्यांना तेवढी संधी नाही. परंतु राजकारणात सौंदर्य आणि बुद्धिमत्ता हा संगम क्वचितच पहायला मिळतो आणि आज आपण याच विषयावर काही आकर्षक व्यक्तिमत्व बघणार आहोत.

पाकिस्तानच्या राजकारणात सौंदर्यवान आणि तरुण महिलांचा दबदबा राहिला आहे. नवनवीन पक्ष सत्तेत आल्यानंतर अशा महिलांची संख्या वाढली आहे. पाकिस्तानात नुकत्याच झालेल्या निवडणुकीत अनेक महिला उमेदवारांनी भाग घेतला होता. त्यातीन अनेक महिला निवडून आल्या आहेत. चला तर बघूया पाकिस्तान राजकारणातील सौंदर्याच्या मलिका….

मरयम नवाज सर्वांत सुंदर महिलांच्या यादित मरयम नवाज शरीफ पहिल्या क्रमांकावर येतात. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची ती मुलगी आणि कल्सोम नवाज यांची पहिली पत्नी आहे. पाकिस्तानमधील राष्ट्रीय राजकारणात त्या सक्रीय आहेत. २०१३ मध्ये प्रधानमंत्री विकास योजनेचा तिला प्रमुख करण्यात आले होते परंतु त्यानंतर पाकिस्तानी हायकोर्टनि तिची नियुक्ती अवैद्य ठरवली आणि तिला राजीनामा द्यावा लागला.

आयला मलिक पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती सरदार फारुख अहमद खान लेघारी यांच्या भावाची मुलगी आणि माजी संघिय मंत्री सुमायरा मलिक यांची ती बहिण आहे. माजी क्रिकेटर इम्रान खान यांच्या तेहरीक-ए-इन्साफ पक्षासाठी त्या काम करतात. आयला हि राजकारणासोबत सक्रीय पत्रकार सुध्दा आहे. सन २००२ ते २००७ पर्यत ती पाकिस्तानी लोकसभा सदस्य होती. २०१३ साली तिचे पद खोट्या पदवीकरिता खारीज करण्यात आले.

हिना रब्बानी खार सर्वांत कमी वयाच्या आणि पहिल्या महिला परराष्ट्रमंत्री राहिल्या आहेत. पाकिस्तान पिपल्स पार्टीसोबत जुळलेल्या हिना रब्बानी खान फॅशनेबल आऊटफिट घालण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या गळ्यातील मोत्याची माळ आणि सनग्लासेस करिता ती नेहमी चर्चेत राहते. बिलावल भुट्टो व तिच्या बद्दल अनेक चर्चा नेहमी रंगत असतात.
फोटो खालील प्रमाणे

शर्मिला फारुकी सिंध प्रांतातील मुख्यमंत्र्याची मुख्य सल्लागार शर्मिला ह्या होत्या. राजकीय सल्लागार म्हणून त्यांनी अनेक पद उपभोगिले आहे. या काळात त्यांच्यावर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहे. तसेच पाचवा मौसम नावाच्या सिरीयल मध्येही त्यांनी काम केलेले आहे.

कश्माला तारिक- कश्मला हि सुरवातीस मानवी अधिकाराकरिता लढणारी एक बुलंद आवाज होती त्यानंतर तिने राजकारणात प्रवेश केला. पाकिस्तानमध्ये होणार्या महिला अत्याचार संबंधित तिची लढाई आजही सुरु आहे. पंजाब प्रांतातील महिला आरक्षित मतदार संघातून पाकिस्तानच्या नॅशनल असेंम्ब्लिवर त्या निवडणून गेल्या होत्या. त्या पाकिस्तान मुस्लिम लीगच्या सदस्या आहेत.

मार्वी मेमन- बेनझीर आर्थिक विकास योजनेची ती अध्यक्ष आहे. २००८ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये निवडून आलेल्या मार्वी सर्वांत कमी वयाच्या लोकप्रतिनिधी होत्या. पाकिस्तान मुस्लिम लीगचे प्रमुख आणि उद्योजक निसार मेमन यांची ती मुलगी आहे. तिने पहिले अनेक राष्ट्रीय आणि अंतराष्ट्रीय वृत्त संस्थेकरिता काम केलेले आहे.
फोटो खालील प्रमाणे

ससुई पलीजो- यांना ससी पलीयो या नावानेही ओळखले जाते. पाकिस्तान पिपल्स पार्टीसाठी काम करणाऱ्या पलीओ सिंधी आहेत. त्या सिंध प्रांतातील पहिल्या महिला आहे ज्या सर्वसामान्य जागेवरून निवडणूक लढवून निवडून आलेल्या आहे. ससुइ यांची आई ह्या व्याख्यात्या होत्या त्यांच्यापासून त्यांना हा गुण मिळाला. त्यांची आजी झरिना बलोच ह्या प्रसिध्द अभिनेत्री,शिक्षिका आणि सक्रीय राजकारणी होत्या…

सुमायरा मलिक या पाकिस्तानमधील लोकप्रिय राजकारणी आणि मानवाधिकार व सामाजिक कार्यकर्त्या आहेत. साहित्यात मास्टर असलेल्या सुमायरा सध्या लोकसभा सदस्य आहे. तिने महिला बालकल्याणचे मंत्री पदही उपभोगले आहे.

शाज़िया मर्री- या सिंध-बलूच पाकिस्तानी राजकारणी आणि नॅशनल असेम्ब्लिच्या सदस्या आहेत. त्या सिंध प्रांताच्या वीज ऊर्जा आणि सूचनामंत्री आहेत. पाकिस्तानी पिपल पार्टीच्या त्या सदस्य आहे. तिचे जन्म ठिकाण कराची आहे. BA मध्ये पदवी घेतलेल्या शाजीया आज एक प्रभावी आवाज आहे.
फोटो खालील प्रमाणे-

फराहनाज इस्पाहनी- पाकिस्तान पिपल्स पार्टीसाठी इस्पाहनी काम करतात. २००८ ते २०१२ या कालावधीत त्यांनी पाकिस्तान नॅशनल असेंम्ब्लित काम केले आहे. पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांच्या त्या मीडिया सल्लागार होत्या. फराहनाज ह्या पत्रकार, राजकारणी आणि पक्षाची भूमिका ठरविण्याचे काम चांगल्या प्रकारे पार पाडतात. त्यांचे संपूर्ण शिक्षण हे प्रदेशात झाले आहे.

शाहीन कौसर दर- या पाकिस्तान पिपल्स पार्टीशी संबंधित आहेत. पाकव्याप्त काश्मिर विधानसभेचे उपसभापती राहिल्या आहेत. बेनझीर भुट्टोपासून त्या प्रेरित होऊन त्या राजकारणात आल्या होत्या.
फोटो खालील प्रमाणे

हि खासरे माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *