भाजपाची हि राष्ट्रीय कृषी विकास परिषद बघून तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल..

सध्या महाराष्ट्रात भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आवश्यकता आहे.पण सरकार ने दुष्काळ जाहीर करून कोणतीही ठोस उपाययोजना केली नाही. यामुळे सध्या शेतकरी वर्ग त्रस्त आहे.

सत्ताधारी म्हणून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज असताना भाजपच्या आमदाराने शेतकरी परिषेदेत बार बालांचा अश्लील डान्स शेतकऱ्यांसमोर करवून शेतकऱ्यांची थट्टा केली आहे.

भाजप आमदार अनिल बोंडे यांच्या कृषी विकास परिषेदेत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. एकप्रकारे या विकास परिषदेच्या नावाखाली शेतकऱ्यांची थट्टा केली आहे. वरुड, मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी वरुड येथे पाच दिवसापूर्वी शेतकऱ्यांसाठी हि राष्ट्रीय कृषी विकास परिषद आयोजित केली होती.

या परिषदेला भाजपच्या मंत्र्यांनी देखील उपस्थित राहून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले होते. पण नंतर घडलेल्या या प्रकाराने संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या व्हिडिओमध्ये बारबाला सोबत एक व्यक्ती देखील अश्लील डान्स करत असल्याचे दिसून येते. हि डान्स करणारी व्यक्ती हि वरुडचे माजी नायबतहसीलदार असल्याचे बोलले जात आहे. हे माजी नायब तहसिलदार साहेब या तरुण बारबाला सोबत तिला नको त्या जागी स्पर्श करून डान्स करत असल्याचे व्हिडिओत दिसून येत आहे.

बघा व्हिडीओ-

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *