पुलवामा हल्ल्यात महाराष्ट्राच्या सुपुत्राला आले वीरमरण..

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवादयांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत ४० जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मदने या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे.

या हल्ल्यात लष्कराच्या एक डझनहून अधिक वाहनांवर हल्ला करण्यात येणार असल्याचे जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या अधिकृत व्यक्तीकडून सांगण्यात आले. झालेल्या हल्ल्यात ५० हून अधिक वाहनांच्या ताफ्याला लक्ष्य करण्यात आले. या ताफ्यात CRPF चे २५४७ जवान होते.

या ताफ्यावर एका दहशतवाद्याने हा आत्मघाती हल्ला केला. यानंतर दहशतवाद्यांनी ताफ्यावर अंदाधुंद गोळीबार केला. यात आतापर्यंत ४० जवान शहीद झाले आहेत तर अनेक जवान गंभीर जखमी झाले आहेत.

महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण-

पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील जवानालाही वीरमरण आलंय. सांगली जिल्ह्यातील सीआरपीएफ जवान राहुल करांडे हे पुलवामा हल्ल्यात शहीद झाले. सीआरपीएफकडून शहीद जवानांबद्दल अजून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाहीये.

मात्र सांगली जिल्हा प्रशासनाकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. सर्व वरिष्ठ अधिकारी परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत. या भीषण हल्ल्यात अनेक जवान जखमी झाले असून याची भीषणता एवढी होती कि गाड्यांचे अक्षरशः तुकडे तुकडे झाले आहेत.

हा हल्ला आदिल अहमद दर उर्फ वकास या दहशतवाद्याने केला आहे. त्याने सुसाईड बॉम्बर बनून जवानांच्या ताफ्यात त्याची गाडी घुसवली. त्या गाडीमध्ये २०० किलोंपेक्षा अधिक स्फोटकं होती.

आदिल दर हा जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी होता. तो २०१६ नंतर या संघनतेत भरती झाला होता.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *