आकाश अंबानीच्या लग्नाची पत्रिका पाहून थक्क होसाल.. बघा व्हिडीओ

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश आणि हिरे व्यापारी रसेल मेहता यांची कन्या श्लोका मेहता यांच्या विवाहाच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासूनच सुरू आहेत. त्यांच्या लग्नाची पत्रिकाही सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

श्लोका मेहता हिरा व्यापारी रसेल मेहता यांची छोटी मुलगी आहे. आकाश-श्लोका या दोघांनी धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल शाळेतून शिक्षण घेतलं आहे. शाळेचे शिक्षण पूर्ण झाल्यावर श्लोका 2009 मध्ये न्यू जर्सीच्या प्रिंसटन यूनिव्हर्सिटीमध्ये शिक्षणासाठी गेली. ती द लंडन स्कूल ऑफ इकनॉमिक्स अँड पॉलिटिकल महाविद्यालयातून विज्ञान शाखेत पदव्युत्तर झाली आहे. श्लोका रोजी ब्लू फाउंडेशनची डायरेक्टर आहे. तसेच ती ConnectFor ची संस्थापक आहे.

सिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी आणि व्यापारी रसेल मेहता यांची मुलगी श्लोका मेहता या दोघांचे लग्न 9 मार्चला मुंबईत होणार आहे. लग्न समारंभ जिओ वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये तीन दिवस असणार आहे. आकाश अंबानीच्या लग्नाची वरात संध्याकाळी 3.30 वाजता मुंबईतील जिओ सेंटरमध्ये जाईल

9 मार्चला लग्नसोहळा पार पडल्यानंतर 10 मार्चला वेडिंग सेलिब्रेशन होणार आहे. हा कार्यक्रम जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये आयोजित करण्यात आला आहे. तर 11 मार्चला वेडिंग रिसेप्शन असणार आहे. यावेळी दोन्ही परिवार आणि जवळचे मित्रमंडळी असणार आहेत. रिसेप्शन सोहळाही जिओ सेंटर येथे होणार आहे.

आता तुम्हीच बघा या लग्नाची मनाला भुरळ घालणारी पत्रिका खाली

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *