उदयनराजे मुड मध्ये “हमे तुमसे प्यार कितना” हे गाणे गातात तेव्हा

लोकप्रिय व्यक्तिमत्व म्हणून उदयनराजे हे आपल्या सर्वाना परिचित आहेत. त्यांच्या अनेक हटक्या कृतीमुळे ते त्यांच्या चाहत्यांच्या मनात घर करून राहतात. त्यांचे लोकात मिसळणे असो किंवा बेधडक वक्तव्य असो यागोष्टी लोकांना प्रचंड आवडतात. महाराज एखादया कार्यक्रमात गेले कि त्या उपस्थित जनसमूहाला आपलेसे करून घेतात. आता पर्यंत राजेंचे अनेक रूपे आपण पाहिले आहेत. पण सातारा मधील या कार्यक्रमातील उदयनराजे एकदम वेगळे वाटतील.

उत्कृष्ट पत्रकार सन्मान पुरस्काराच्या कार्यक्रमात खासदार उदयनराजे यांनी गाणं म्हटल्यानं अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. व्यासपीठावर बोलत असताना त्यांनी उपस्थितांना प्रश्न केला की, तुम्हाल गाणं ऐकायचे आहे का? बराच वेळापासून सगळ्यांची भाषणं चालू आहेत तुम्हाला कंटाळा आला असेल, असे म्हणत उदयनराजेंनी थेट गाणं गायला सुरवात केली.

त्यांच्या गाण्यामुळे सर्व पुरस्कार्थी व समुदाय भावनिक झाला. राजे आपल्या लोकांवर नेहमीच माया लावत असतात. त्यांची दहशत हि प्रेमाची आहे. आता पर्यंत अनेकांना राजेंनी मदत केली आहे. उदयनराजे हे शिवाजी महाराज यांचे १६ वे वंशज आहे. देशातील सर्वात जास्त मताधिक्याने निवडून आलेले खासदार म्हणून त्यांचा परिचय आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार आहेत.

काही दिवसापूर्वी त्यांना भेटायला भारतीय सैन्य दलातील जवान आला होता त्याला त्यांनी आपल्या सोबत विमानात घेऊन आल्याचा किस्सा त्या जवानाने सोशल मीडियावर टाकल्याने लोकांना समजला आणि राजेंचा दिलदारपणा पुन्हा समोर आला. उदयनराजे यांचे अनेक किस्से आपल्याला माहिती आहेत पण आजचे त्यांचे गाणे नेहमीच आपल्या लक्षात राहील.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *