दारू मोजायच्या ग्लासला पेग (PEG) का म्हणतात वाचा खासरे इतिहास..

सायंकाळ झाली कि अनेक मद्यशौकीनाचे पाय बार कडे वळतात परंतु पेग वर पेग रिचवनार्यांनी ग्लासला पेगच का म्हणतात याचा विचार केला का ? नाही आणि करू पण नये तो ताण घ्यायला खासरे आहेना. बहुतांश लोक पेग बोलतात याचाच अपभ्रंश पेक असा झाला आहे. आज बघूया दारू असलेल्या ग्लासला पेगच का म्हणतात.

भारतात मद्याचा इतिहास तर देव देवताच्या काळापासून आढळते. पुराणात देखील मदिरा म्हणून दारूचा उल्लेख करण्यात आलेला आहे. अनेक देव आणि असुर याचे चाहते होते. त्याला अनुसरून अनेक चित्रपटामध्ये देखील याचे सीन दाखविले जातात. इंद्राच्या अप्सरा नाचताना मदिरापान केले जायचे असे दाखविण्यात येते.

परंतु मदिरा हि पेग म्हणून का ओळखली जात असेल तर या गोष्टीचा शोध घेण्याकरिता आपल्याला पाश्चिमात्य देशाकडे जावे लागेल कारण हा शब्द देखील पाश्चिमात्य देशातील आहे. तर याचा इतिहास कि लंडन मध्ये मोठ्या प्रमाणात थंडी असल्याने तिथे मद्यपान करणे वावगे नाही तिथे स्त्रिया देखील मद्यपान करतात. भारतात चित्र मात्र या उलट आहे. मद्यपान करणाऱ्या लोकांना इथे गुन्हेगार समजल्या जाते अशी भावना आहे.

लंडनला थंड वातावरणात खाण कामगारांना संध्याकाळी काम संपले की खाण मालक प्रत्येक संध्याकाळी कामगारांना एक ग्लास दारू देत असे तेंव्हा कामगार त्या आनंदायी दारुच्या ग्लासाला PRECIOUS EVENING GLASS असे संबोधत याच शब्दाचे संक्षिप्त रूप P.E.G. ( PRECIOUS EVENING GLASS) हे आहे. आणि हा शब्द सर्वत्र प्रसिद्ध झाला आणी दारूच्या ग्लासला पेग म्हणून संबोधल्या जाऊ लागले.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका..

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *