एक दणक्यात कुलूप तोडणारे बाळासाहेबांचे “बबन” कोण ? वाचा खासरे माहिती

बाळासाहेब चित्रपटात अनेक भूमिका आहेत आणीन प्रत्येक भूमिका ह्या खऱ्या आयुष्यातून घेण्यात आलेल्या आहेत. मागे +आपण दत्ताजी यांच्या बद्दल माहिती बघितली आणि शिवसेना जडणघडणीत त्यांचे योगदान बघितले. आज असेच शिवसेनेतील एक अपरिचित व्यक्तिमत्व बघूया..

सर्वात पहिले सिनेमातील सीन बघूया काय होता, एअर इंडिया मध्ये स्थानिक मुलांना नौकरी देण्याकरिता बाळासाहेबांच्या नेतृत्वात मोर्चा एअर इंडियाच्या ऑफिसवर जातो. ऑफिसच्या गेटला मोठे कुलूप लावलेले आहे. आणि लोकांना मध्ये येऊ दिल्या जात नाही. परंतु मोर्चा मध्ये जाणार हे बाळासाहेब ठरवितात आणि बबनला आवाज देतात “बबन फोड तो टाळा” घेतली हातोडी आणि तोडला टाळा असा भारदस्त देहाचा एक व्यक्ती एका दणक्यात कुलपाचे दोन तुकडे करतो.

शिवसेनेचा प्रचार हा शाखाप्रमुखांनी केला. गावागावात शाखा तयार झाल्या आणि त्या शाखेत घडली निष्ठावान शिवसैनिक जे बाळासाहेबांच्या एका आदेशासाठी जीव द्याला हि तयार कारण त्यांना माहिती होते कि बाळासाहेबांचा आदेश हा त्यांच्या करिता आदेश नसून त्यांच्या भल्यासाठी उचललेले एक पाउल आहे. अनेक शिवसैनिकांनी दंग्यात जीव गमावले, लाखो केसेस परंतु भविष्यासाठी हे झगडत राहिले.

असाच एक बाळासाहेबांचा शिवसेनेच्या सुरवातीच्या प्रवासातील शिवसैनिक बबनदादा पाटील मुळचे कोकणातील परंतु रोजगारा करिता त्यांनी इतराप्रमाणे मुंबई गाठली. आणि तिथे मराठी माणसावर होणार्या अन्यायाविरुध्द बाळासाहेबांसोबत लढले. सध्या बबन पाटील काय करत आहे खाली बघूया

तर आम्हाला मिळालेल्या माहिती नुसार हे व्यक्तिमत्व आहे रायगड शिवसेना मा. जिल्हाध्यक्ष बबन दादा पाटील हे आहे. शिवसेनेच्या सुरवातीपासून ते बाळासाहेबांसोबत जुळलेले आहेत. सध्या शिवसेना रायगड जिल्हा सल्लागार पदावर ते आहेत. शिवसेनेची वाढ हि निष्ठावंत कार्यकर्त्या मुळेच झालेली आहे. त्यापैकी एक बबनदादा पाटील हे आहेत.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका..

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *