“सावधान इंडिया” च्या अगोदर तुफान चालणारा पेपर “काली गंगा”

गुन्हेगारी जगताची माहिती किंवा गुन्ह्याची माहिती मिळण्या करिता जास्त वृत्तपत्र मिळत नव्हते. त्या काळात विदर्भ आणि मराठवाड्यात जोरदार चालणारे वृत्तपत्र काली गंगा , पोलीस टाईम्स पेक्षाही त्याचा खप जास्त होता. खून, दरोडा , बलत्कार इत्यादी घटना वाचण्याकरिता ह्या पेपरला पसंती दिल्या जायची.

संपूर्ण रंगीत असलेला हा पेपरचा वाचक वर्ग वेगळा होता. आज ज्या प्रमाणे घरा घरात सावधान इंडिया बघितले जाते त्या प्रमाणे बस स्थानकावर येणारा हा साप्ताहिक पेपर घ्याला बरीच रीघ असायची. सोशल मिडियाच्या अगोदरचा हा काळ होता. त्यात भर म्हणजे मटका वाल्यांची आठवड्यातील सर्व आकडे आणि शुभांक इथे मिळत असल्याने रातोरात श्रीमंत होण्याचे स्वप्न बघणारे या वृत्तपत्रास पसंती देत होते.

काली गंगाच्या फ्रंट पेजवरच त्याचा उद्देश कळत होता ” गुन्हेगारी जगताचे मागोवा घेणारे साप्ताहिक” हे त्यांचे ब्रीदवाक्य होते. या पेपरचे विशेष म्हणजे बातम्याचे शीर्षक असायचे उदाहर्णाथ “तो होता भोळा, परंतु तिने कापला त्याचा गळा” किंवा “आंतरजातीय प्रेम प्रकरण खटकले, आई वडिलांनी जीवे मारले” असे रंजक हेडिंग असल्याने अनेक लोक बातमी आणि बातमी वाचून काढत असे.

आंबट शौकीन लोक देखील याची खरेदी मोठ्या प्रमाणात करत असे कारण वृत्तपत्रात येणारे फोटो, मृताचे खरे फोटो या वृत्तपत्रात दिले जायचे मग त्या महिला असो का पुरुष आणि वाचणारा हा आपल्या वेगळ्या जगात जाऊन त्याचा विचार करायचा. सध्या हे वृत्तपत्र जास्त प्रमाणात दिसत नाही परंतू एक काळ या वृत्तपत्रांनी गाजविला हे त्रिकालाबाधित सत्य आहे.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका..

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *