नियमित शिळे अन्न खाताय, थांबा ! होऊ शकतात हे गंभीर आजार…

सध्याच्या काळात माणसाचे जीवन एवढे व्यस्त झालं आहे की त्याला आपल्या आरोग्यासाठी महत्वाच्या गोष्टी करण्यासाठी सुद्धा वेळ नाहीये. व्यस्त जीवनशैली मध्ये माणसांना ताज अन्न बनवण्यास सुद्धा वेळ राहिला नाहीये. त्यामुळे बरेच वेळा शिळं अन्न खाण्याची वेळ येते. शिळे अन्न खाल्याने अनेक आजारांना एक प्रकारे निमंत्रण आपण देत असतो. त्यामुळे शिळे अन्न खाणे प्रत्येकाने टाळायला हवे. धावपळीच्या जीवनात खाण्या-पिण्याकडे लक्ष देणे कठीण होऊन बसले आहे. यामुळे हृदयरोग, लठ्ठपणा, कोलेस्ट्रॉल सारख्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. आज काल या समस्या खूप जास्त प्रमाणात वाढल्या आहेत. या सर्व समस्यांचे कारण शिळं अन्न खाणे बानू शकते. व्यस्त जीवनशैलीमूळे घरगुती काम करणाऱ्या महिलांना २ वेळेस चे जेवण बनवणे शक्य होत नाही.

सोबतच ताजे टोमॅटो वापरण्याऐवजी टोमॅटो पावडर वापरले जात आहे. पीठ सुद्धा जास्त दिवस वापरता यावे म्हणून एकदाच जास्त प्रमाणात मळून ठेवले जात आहे. याशिवाय सकाळी बनवलेली भाजी रात्री खाणे किंवा रात्री बनवलेली भाजी सकाळी खाणे. यामुळे संक्रमण किंवा पोटाचे दुसरे आजार होऊ शकतात. चला तर आज खासरेवर जाणून घेऊया शिळं जेवण केल्याने के के दुष्परिणाम होतात.

बॅक्टेरिया तयार होतो-
जेव्हा आपण ताजं अन्न खातो तेव्हा बॅक्टेरिया आणि इतर सूक्ष्मजीवांचा समावेश होण्याचा धोका कमी असतो. हरच जर आपण शिळं अन्नाच्या बाबतीत बघीतले तर त्यात हमखास बॅक्टेरिया असतोच. बॅक्टेरियाने शिळ्या अन्नात टॉक्सिस आणि रसायनं तयार होतात जे की आरोग्यासाठी खूप धोकादायक असतात.

दुसरे अन्न सुद्धा होते दूषित-
फ्रिजचा उपयोग करा पण हे लक्षात असुद्या की फ्रीजमध्ये ठेवलेले खूप शिळं अन्न वापरू नये. हर तुमच्या आरोग्यासाठी खूप धोकादायक ठरू शकते. बॅक्टेरिया युक्त आणि अन्य सूक्ष्मजीव असलेले अन्न फ्रिजमध्ये ठेवल्यास फ्रिजमध्ये ठेवलेले इतर चांगल्या ताज्या अन्नावर सुद्धा याचा परिणाम होऊ शकतो. जे अन्न फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर तुम्हाला वाटतं की ते तुम्ही सुरक्षित केलं आहे पण तेच अन्न खराब होऊन त्यापासुन तुम्हाला इतर आजार उद्भवण्याची शक्यता असते.

पौष्टिक नसते हे अन्न-
खूप जास्त वेळ अन्न फ्रीजमध्ये ठेवल्यास यामध्ये पोषक तत्व कमी होण्यास सुरुवात होते. पोषक तत्व कमी झाल्यास ते अन्न बेकार होते. यामुळे उरलेलं अन्न खूप जास्त काळ स्टोर करून ठेवणे टाळावे.

अन्नातून विषबाधा-
शिळं अन्न खाल्याने तुम्हाला विषबाधा होण्याचा धोका संभवतो. खूप जास्त वेळ राहिलेलं अन्न आरोग्यासाठी चांगले नसते कारण त्यात बॅक्टेरिया तयार होतो.

अतिसारची समस्या-
फ्रिजमध्ये ठेवलेले अन्न सतत थंड व गरम करण्याच्या प्रयत्नात त्यात असलेले आवश्यक पौष्टिक तत्व नष्ट होतात. सोबतच त्यात हानिकारक जिवाणूंचा समावेश असतो. हे अन्न खाल्याने तुम्हाला अतिसारची समस्या सुद्धा होऊ शकते.

डेअरीच्या पदार्थात असतो बॅक्टेरिया-
शिळ्या अन्नात बॅक्टेरिया तर तयार होतोच पण डेअरीच्या पदार्थामध्ये बॅक्टेरिया खूप जास्त प्रमाणात आणि लवकर तयार होतो. त्यामुळं डेअरीचे पदार्थ पाश्चराईज्ड असायला हवेत ज्यामुळे टीवत बॅक्टेरिया जास्त तयार होणार नाही. याप्रकारचे दूध पिल्यास तुम्हाला नुकसान होण्याची शक्यता कमी असते.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *