लोकवर्गणीतून लोकसभा निवडणूक लढविणार हा नेता..

लोकसभा निवडणुकीचे वारे सुरु आहे आणि सगळे नेते बाशिंग बांधून तयार आहेत. निवडणूक म्हटले कि पैश्याचा महापूर परंतु असाही एक नेता आहे जो लोकांनी दिलेल्या वर्गणीतून लढणार आहे. आज खासरेवर बघूया कोण आहेत हा नेता आणि का घेतला असा निर्णय,

तर हा नेता आहे स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर त्यांनी नुकताच फेसबुक पोस्ट करून याची घोषणा केली आहे. त्यांची पोस्ट खालील प्रमाणे आहे.

“पैसा महत्वाचा नसतो परंतु पैश्याशिवाय काही नसते. हे सर्वाना माहीती आहे. आम्ही चळवळीत काम करतो, हक्का करीता लढतो. परंतु हा संघर्ष करताना अनेक आर्थिक अडचणी येतात.. आज पर्यंत माझ्या १५ वर्षाच्या सामाजिक आयुष्यात एक रुपयाही भ्रष्टाचाराच्या रुपाने अथवा वाम मार्गाने कमावला नाही कारण जनतेने मला कधी कमीच पडु दिले नाही… शिवाय आपल्या बळिराजाच्या रक्तातचं इमानदारी असते त्यामुळे मला त्याचा कधी मोह ही झाला नाही…

त्याचीच प्रचिती आज वरवंड येथील आयोजित भव्य अशा शेतकरी मेळाव्यात आली.. वरवंड व डोंगरखंडाळा ग्रामस्थांनी दुष्काळग्रस्तांच्या एल्गार मेळाव्याचे आयोजन केले होते.. त्यावेळी किंन्होळाच्या गावकऱ्यांनी दीड लक्ष व खुपगावच्या गावकऱ्यांनी एक लक्ष रुपयांची मदत या मेळाव्यात केली..

त्याप्रसंगी त्यांनी मला “भाऊ तुम्ही या मुजोर सत्ताधिशांच्या विरोधात जो लढा उभारलाय तो खरंच महत्वाचा आहे.. तो लढा असाच पुढे चालत ही येवु घातलेली लोकसभा ही या जिल्ह्यासाठी परीवर्तनाची लढाई ठरावी” अशीही साद घालत आगामी काळात होनार्या धनशक्ती विरूद्ध जनशक्ती लढ्यात आम्ही तुमच्या सोबत खंबीरपणे सोबत राहु असे आश्वस्थ केले…

माझी निवडणूक लोकवर्गणीतून होणार हे मला माहीती आहे… कारण जनता नेहमी सत्यासोबत असते.. याच जनतेने राजु शेट्टी साहेबांसारख्या माणसाला “एक नोट,एक वोट” देवुन तब्बल लाखोंच्या मताधिक्यांने निवडुन दिले आहे.. आणि येनारी बुलढाणा लोकसभा निवडणुक ही अशीच असेल, कारण लोकांची कामे करनार्यांची काळजी लोंकानाही असतेच ना… आपल्या या सुखद धक्क्याने खरोखरच भारावलो आहे.. आपले असेच प्रेम माझ्यावर असु द्या..!

शेवटच्या श्वासांपर्यत आपल्या हक्कासाठी लढत राहणार. हा रविकांत तुपकाराचा शब्द आहे.. कारण… “हाक तुमची अन् साथ आमची”

त्यांनी घेतलेला हा निर्णय स्तुतीप्रिय आहे आणि लोक त्यांना मदत करत आहेत हे महत्वाचे आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक नेत्यांनी हा निर्णय घ्यावा म्हणजे स्वतःची कुवत आपल्याला समजेल आणि पैश्याचा अपव्यव देखील कमी होईल.

आपल्याला हि माहिती आवडल्यास पेज नक्की शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका..

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *