असं नेमकं काय घडलं 1965 च्या युद्धात त्या मंदिरात ज्यामुळे आपसात भिडले पाकिस्तानचे सैनिक…

पाकिस्तानने जेव्हा जेव्हा भारताचं वाईट करण्याचा(1965 भारत-पाक युद्ध) विचार केला आहे तेव्हा त्यांना स्वतःलाच जास्त नुकसान झेलावे लागले आहे. राजस्थानच्या पश्चिम मध्ये असलेल्या जैसलमेर पासून 120 किमी आणि तनोट माता मंदिरापासून 5 किमी अगोदर घंटीयालीचा पवित्र दरबार आहे. घंटीयाली माता आणि तनोट माताचे राजस्थान मध्ये राहणाऱ्या जवानांना खूप महत्त्व आहे. त्या भागात राहणारे सैनिक या दोन्ही मंदिरात पूजा करतात.

बोलले जाते की 1965 च्या भारत-पाक युद्धात या मातांनी असा काही चमत्कार केला की पाकिस्तान सैन्य स्वतःच हरले आणि तिथेच संपले. माता घंटीयालीच्या दरबारात पाकिस्तान सैन्याचे वाईट हेतू चमत्काराने नष्ट झाले. झाले असे की शत्रूच्या सैन्याला भ्रम झाला आणि ते आपसातच लढले आणि एकमेकांविरोधात लढून मारले गेले.

जे सैनिक या मातेच्या मंदिरात घुसले होते ते आपसातच भांडून मेले. मातेच्या चमत्काराने पाक सैन्य आंधळे झाले होते असे बोलले जाते. त्यामुळं त्यांना कोणते भारतीय सैनिक आणि कोणते पाकिस्तानचे हे समजलं नाही.

बीएसएफ चे जवान सुनील कुमार अवस्थी यांनी सांगितले की ते मातेची पूजा करतात. उत्तर प्रदेशचे रहिवासी असलेले सुनील कुमार यांनी या मातेच्या अनेक पौराणिक घटना विषयी माहिती दिली. हे मंदिर 1200 वर्षे जुने असल्याचे त्यांनी सांगितले. माता घंटीयाली ने 1965 मध्ये भारतीय सैन्याची साथ दिली आणि त्यांची बहीण माता तनोट देवी ने 1971 मध्ये सैन्याची मदत केल्याचे कळते. या देवींच्या आशीर्वादाने भारतीय सैन्य इथे कधी पराजित होत नसल्याचे बोलले जाते.

सुनील अवस्थी यांनी सांगितलं की 1965 च्या युद्धाच्या वेळी मातेने असा काही चमत्कार केला की पाकिस्तानचं सैन्य भारतीय सैनिक समजून एकमेकांवर तुटून पडले आणि बघता बघता सर्वाना संपवलं. पाकिस्तानचे काही सैनिक घंटीयाली देवीच्या मंदिरापर्यन्त पोहचले होते. त्यांनी देवीच्या अंगावरील शृंगार उतरवला व मंदिराला तोडण्याचा प्रयत्न केला त्यानंतर मातेने चमत्कार केला अशी लोकांमध्ये भावना आहे. सध्या या मंदिराच्या सुरक्षेची जबाबदारी बीएसएफ च्या 135 व्या तुकडीकडे आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *