निर्णायक सामना असल्यास भारतीय संघ कोणाच्या बापाला ऐकत नाही! 11 वेळेस केली ही कमाल..

आज ऑकलंड येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात दुसरा ट्वेन्टी ट्वेन्टी सामना खेळवण्यात आला. भारताचा पहिल्या सामन्यात दारुण पराभव झाल्याने या सामन्यात भारतीय संघावर चांगलेच दडपण होते. या सामन्यात पराभूत झाल्यास मालिका गमावण्याचे दडपण भारतीय संघावर होते. पण भारतीय संघाने आपली ऐतिहासिक कामगिरी कायम ठेवत निर्णायक सामन्यात परत एकदा विजय मिळवला आहे.

भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा आणि दमदार सलामीच्या जोरावर भारताने हा दुसरा ट्वेन्टी-ट्वेन्टी सामना सहज जिंकत मालिकेतील आपले आव्हान कायम ठेवले.

न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने १५८ धावा केल्या होत्या. भारताने रोहित शर्माच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर या आव्हानाचा सहज पाठलाग केला.

भारतीय संघाने न्यूझीलंडला सुरुवातीलाच मोठे झटके दिले. भारताच्या कृणाल पंड्याने तीन विकेट्स मिळवत न्यूझीलंडच्या डावाला खिंडार पाडले. कृणालला यावेळी अन्य गोलंदाजांनीही चागली साथ दिली. न्यूझीलंडकडून कॉलिन डी’ ग्रँडहोमने अर्धशतकी खेळी साकारल्याने न्यूझीलंडला सन्मानजनक स्तिथीत पोहचता आले.

न्यूझीलंडच्या १५९ धावांचा पाठलाग करताना भाराताच्या सलामीवीरांनी दमदार फटकेबाजी केली. रोहितने यावेळी 29 चेंडूंत ३ चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर ५० धावांची खेळी साकारली. धवनने ३० धावा करत रोहितला चांगली साथ दिली.

भारताने सलग ११ व्या वेळेस केली ही निर्णायक सामन्यात अशी कामगिरी-

भारतीय संघ हा सामना हरला असता तर मालिकेपासून हाथ धुवावा लागला असता. पण भारतीय संघ सहजा सहजी हार मानत नाही. भारतीय संघाने २०१६ नंतर सलग ११ वेळेस निर्णयाक सामन्यात विजय मिळवला.

म्हणजेच मालिकेत निर्णायक सामना असल्यास भारतीय संघ पराजित होतच नाही. आणि ही कामगिरी भारतीय संघाने १-२ वेळेस नाही तर तब्बल ११ वेळेस केली आहे.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका..

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *