आईच्या उपचारासाठी “तो” वेचतो कचरा..

सिनेमात अनेकदा आपण बघतो कि नायक लहान असताना आई गरीब आणि बिमार तिला वाचविण्यासाठी नायकाची धडपड परंतु असे खऱ्या आयुष्यात झालेले आहे. आज खासरेवर बघूया नागपूरची हि करूणकथा, कदाचित त्यांना मदत हि मिळू शकेल.

फुलचंद राजेश सोनवणे कुही मांढळ तालुका ससेगाव जिल्हा नागपूर येथे तो राहतो. चौथ्या वर्गात असलेला फुलचंद या घटनेमुळे संपूर्ण बदलून गेलाय. अचानक त्याच्या या कोवळ्या खांद्यावर मोठी जवाबदारी येऊन पडली आहे. फुलचंदचे वडील कचरा उचलायचा व्यवसाय करतात आणि आई शेतमजुरी करते. घरी एक वर्षाचा लहान भाऊ आहे. घरात विज नाही.

रॉकेलच्या चिमणीच्या प्रकाशात रात्र काढावी लागते. २४ जानेवारी रोजी अचानक सर्वेजन झोपले असता चिमणी पडली आणि आई जिथे झोपली होती तिथे आग लागली आईचा आवाज ऐकून मुले उठली. वडिलाने मुलाला बाजूला करून आईला हाताने विझवण्याचा प्रयत्न केला. आवाजाने शेजारी आली त्यांनी पाणी टाकून आग विझवली. परंतु आई बरीच जळाली आणि तिला विझवताना वडिलाचे दोन्ही हात जळाले.

वीज मीटर घेण्यासाठी जमा केलेले ५ हजार रुपयात आईच्या औषधाचा खर्च कसाबसा निघाला. परंतु आता पैसे संपले, वडिलाचे हात जळाल्याने ते कचरा उचलू शकत नाही. म्हणून फुलचंद रोज कचरा उचलतो आणि ४०-५० रुपये जमा करून औषधे आणतो. रुग्णालयात आईला मिळणाऱ्या जेवणात तो, लहान भाऊ आणि वडील असे चौघे जेवतात. परंतु आता तेही बंद झाले हे फुलचंद रडत सांगत होता.

त्याने खिशातील औषधाची चिठ्ठी दाखवली आणि हे पैसे कोठून आणू असा प्रश्न हि केला. समाजातील दान शूर लोकांनी समोर येऊन त्यांचा जेवणाचा खर्च उचलावा आणि औषधाची सोय लावावी. मानवसेवा हीच ईश्वर सेवा आहे.

आपल्याला हि माहिती पटल्यास शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका..

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *