‘या’ कारणामुळे धनंजय मुंडेंचं व्हॉट्सअ‍ॅप झालं होतं बंद; तुम्हीही वाचाल तरच वाचाल!

नुकतेच विधान परिषद विरोधी पक्ष नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांचे जनसंपर्क अधिकारी प्रशांत जोशी यांचे व्हॉट्सअ‍ॅप अचानक बंद झाले होते. विशेष म्हणजे, ‘आपला फोन नंबर व्हॉट्सअ‍ॅपसाठी बॅन करण्यात आल्याचा मेसेज’ व्हॉट्सअ‍ॅपकडून त्यांना येत होता. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी सरकारवर यासंबंधी आरोप केले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसची निर्धार परिवर्तान यात्रा सुरू असून त्यानिमित्त महाराष्ट्र दौरा सुरु आहे. धनंजय मुंडे राज्य सरकार आणि मोदी सरकारवर जोरदार टीका करत आहेत. त्यांचे व्हाट्सएप यामध्ये मोलाची भूमिका बजावत होतं. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या मधुमातून सर्व माहिती एका क्लीकवर पाठवणे सोपे व्हायचे.

हे काम प्रशांत जोशी बघायचे. प्रशांत जोशी हे गेल्या 13 वर्षांपासून मुंडे यांचे स्वीय सहायक म्हणून काम पाहतात. सध्या ते धनंजय मुंडेंसोबत राष्ट्रवादीच्या ‘निर्धार परिवर्तनाचा’ या यात्रेचं मीडिया मॅनेजमेंट करत आहेत.

विरोधी पक्षनेत्याच्या पीआरओच्या फोनवर नजर ठेवणं, त्यांचा नंबर बॅन करणं, त्यांच्या फोनवर बंदी आणणं, म्हणजे देशात आणीबाणी लागू करण्यासारखंच असल्याचा आरोपही मुंडे यांनी केला. पण त्यांचं व्हॉट्सअ‍ॅप का बंद झालं होतं याचं खरं कारण समोर आलं आहे. हे कारण तुम्हीही लक्षात ठेवा नाही तर तुमचंही व्हाट्सअ‍ॅप बंद होऊ शकते.

यामुळे बंद झाले मुंडेंचे व्हाट्सअ‍ॅप-

व्हॉट्सअ‍ॅपने बल्कमध्ये मॅसेज पाठविणाऱ्यांना बॅन करण्याचा दणका दिला आहे. व्हाट्सअ‍ॅपने अशी मशीन लर्निंग सिस्टिम बनविली आहे, जिच्या आधारे खोटे मॅसेज किंवा मोठ्या प्रमाणावर मॅसेज पाठविणाऱ्यांचा नंबरच बंद करण्यात येत आहे. असे जवळपास दर महिन्याला 20 लाख अकाऊंट व्हाट्सअ‍ॅप बंद करत आहे.

धनंजय मुंडे यांच्या मोबाईलमधून देखील मोठ्या प्रमाणावर मेसेज पाठवल्याने त्यांचं व्हाट्सअप बॅन करण्यात आलं आहे. आपणही अनेकदा मोठ्या प्रमाणात मेसेज फॉरवर्ड करतो. पण यानंतर खबरदारी घ्या, नाही तर तुम्हालाही व्हाट्सअप पासून दूर जावे लागेल.

लक्षात असुद्या मित्रपरिवाराला गुड मॉर्निंग अन गुड नाईटचे मेसेज पाठवून ते काही वाचणार पण नाहीत अन कसल्या सणाला शुभेच्छा दिल्या तरी ते टाळतीलच. त्यापेक्षा जास्त मेसेज पाठवत बसण्यापेक्षा मोजका वापर करून आपले व्हाट्सअप वाचवा.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *