पूनम महाजन यांच्या बेताल वक्तव्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्याचे उत्तर..

आदरणीय प्रमोद जी महाजन यांच्या कन्या श्रीमती पूनम ताई महाजन जी आपणास स्वतंत्र अशी वेगळी ओळख नाही. त्यामुळे आपला पत्राच्या सुरुवातीला उल्लेख करताना आपल्याला काय संबोधावे याचा विचार पडला होता. ताई आपण १२ वर्ष राजकारणात आहात आजही स्वतःची ओळख निर्माण करू शकला नाहीत. त्यामुळे त्याचे मनामध्ये शल्य असले पाहिजेत म्हणूनच आपण महाराष्ट्रातील एका कर्तृत्वान धुरंधर राजकीय नेत्यांबद्दल बेताल वक्तव्य करून स्वतःची ओळख बनवण्यासाठी धडपडत आहात.

ताई आपण भाजप युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहात. आपल्या पासी एवढे मोठे पद आहे त्याचा उपयोग आपण युवकांना दिशादर्शक कार्यक्रम राबवण्यासाठी करायला हवा. पण ते न करता आपण वेगळ्याच गोष्टीत अडकून आहात. एवढे मोठे पद असून आपण निष्क्रिय राहिलात. कोणताही सकारात्मक कार्यक्रम आपण राबवू शकला नाहीत.

त्यामुळे आपल्या वरिष्ठ नेत्यांना खुश करण्यासाठी शरद पवार साहेबांसारख्या व्यक्तीवर आपल्याला खालच्या स्थरावर जाऊन टीका करावी लागत आहे. आपले वडील सुसंस्कृत राजकारण करणारे व्यक्तिमत्व होते त्यांचा सुसंस्कृत वारसा आपण चालवायला हवा पण आपण द्वेषाचे राजकारण करून मा.नरेंद्र मोदी व अमित शाह यांची मर्जी प्राप्त करायच्या प्रयत्न करत आहात.

आपल्या पक्षातील वाचाळवीर नेत्यांच्या स्टेटमेंट वर आपण शांत राहून गांधारीची भूमिका घेतल्याचे रोहित दादा पवार यांचे वक्तव्य समर्पक वाटत आहे. आपण सभ्यपणा शिष्टाचार रोहित पवार यांच्याकडून नक्कीच शिकायला हवा. आपण त्यांच्या आजोबावर व्यक्तिगत टीका केली पण त्यांनी राजकारणातील शिष्टाचार ढळू न देता आपल्यावर कोणतीही व्यक्तिगत टीका केली नाही.

ताई आपल्यावर मी व्यक्तिगत टीका करू इच्छित नाही कारण आमची ती संस्कृती नाही आहे. शरद पवार साहेबानी आज पर्यंत जे काही कार्य केले आहे. त्याबद्दल राजकारणा पलीकडे जाऊन देशातील सर्वच वरिष्ठ नेत्यांनी गौरव केला आहे. स्वतः आपले वडील प्रमोद महाजन यांनी सुद्धा पवार साहेबांच्या संस्थात्मक कार्याचे कौतुक करत आले आहेत.

आपले नेते ज्यांच्यासाठी आपण हा जो काही आटापिटा करत आहात त्या नरेंद्र मोदी यांनी सुद्धा पवारसाहेबांच्या रचनात्मक कार्याचे कौतुक करून त्याचा वेळोवेळी सल्ला घेतो ते गुरु प्रमाणे आहेत असे म्हटले होते. ताई आपण काहीतरी रचनात्मक काम करून स्वतःचे दीर्घकाळ चालणारे राजकारण करावे आज १२ वर्षात आपण काय काम केले हा जर प्रश्न विचारला तर ताई आपल्याकडे काय उत्तर आहे ?? त्यामुळे आपण हे द्वेषाचे राजकारण सोडून रचनात्मक राजकारण करायला शिका..

आणि हे विसरून चालू नका कि आपले वडील स्वर्गीय प्रमोदजी महाजन साहेबांना “जाणता राजा” म्हणून संबोधत होते. बघितली नसेल तर कळवा नक्की पाठवू..
धन्यवाद
आपला
कुणाल वेडे पाटील 9850403999

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *