शरद पवारांना शकुनी मामा म्हणणाऱ्या पुनम महाजनांना तिखट भाषेत खुलं पत्र!

पत्रास कारण की
प्रिय पूनम, ( चिऊताई ),

मुद्दामहून पूनम लिहीते कारण वयाने तु माझ्या पेक्षा लहान, पदाने मात्र महान. पण एका क्षणात किती लहान केलंस तुझ्या पदाला. आपल्या पित्यासमान असलेल्या आदरणीय श्री शरद पवार साहेबांना महाभारत आणि रामायणातील पात्रांच्या नावांचा उल्लेख करून.

कशी काय दुर्बध्दी सुचली तुला. साहेब आणि स्व. प्रमोद काका किती मित्र होते. साहेबांचे राजकारणा व्यतिरिक्त लाखो मित्र आहेत. एवढंही माहित नाही तुझ्या पेक्षा साहेबांचे वय दुपटीने जास्त. तुझ्या वयापेक्षा जास्त राजकारणाचा अनुभव आहे साहेबांना. राजकारणाचा नव्हे समाजकारणाचा. म्हणूनच संपूर्ण देशात साहेबांना एक वेगळं स्थान आहे.

पण तुला हे सांगुन काय उपयोग. लहानपणीच बापाचं छत्र हरवल्यावर अशी मानसिकता होणारचं. म्हणूनच आमच्या भावडांनी ‘प्रविण ने प्रमोद को क्‍यू मारा अशी मुंबईत पोस्टर लावली.’ यामुळे तुला समज आली असेलच.

लक्षात ठेव, केवळ पदाने माणूस मोठा होत नसतो तर तेवढं कर्तृत्व करावं लागतं. प्रसिद्धीच्या हव्यास करू नकोस. त्याऐवजी कामाकडे लक्ष दे. तुमच्या पक्षाचे चांगले नाव कर. गोर गरीब जनतेचे प्रश्न सोडव. लोक प्रतिनिधी हो. प्रवक्ता नको. आपल्या महाराष्ट्रात मराठी भाषेत एक म्हण आहे *अंथरूण पाहून पाय पसरावे.*

मला वाटतं चाळीशी गाठलेल्या लहान बहिनीला ( खरीखुरी नव्हे ) एवढी समज पुरेशी होईल. पुन्हा अशी घोडचूक नको. नाहीतर वयाने मोठी म्हणून कानाखाली—–‘
तुझीच,

सौ.अनिता महेश भामरे,
अध्यक्षा, राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस नाशिक शहर

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *