ICC ने टाकलेला हा व्हिडीओ भारतीय संघाने आणि रोहित शर्माने १०० वेळा बघायला हवा!

वेलिंग्टन येथे झालेल्या भारत आणि न्यूझीलंड संघांमधल्या दौऱ्यातल्या पहिल्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात टीम इंडियाला लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला आहे. हा सामना जिंकत न्यूझीलंडने मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे.

या सामन्यात सलामीवीर कॉलिन मुनरो आणि टीम सिफर्ट यांनी केलेल्या अर्धशतकी भागीदारीच्या जोरावर न्यूझीलंडने भारतासमोर मोठे आव्हान ठेवले. २२० धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ १३९ धावांवर आटोपला. महेंद्रसिंह धोनी आणि कृणाल पांड्याने शेवटी ५२ धावांची भागीदारी करून भारताला अगदी लाजिरवाणा पराभव होण्यापासून वाचवले.

न्यूझीलंड संघात आक्रमक फलंदाजांसोबत चांगल्या गोलंदाजांचा देखील भरणा आहे. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी आज चांगली गोलंदाजी केली. न्यूझीलंडच्या स्पिनर्सनी खासकरून खूप चांगली गोलंदाजी केली. न्यूझीलंड संघातील मिचेल सेंटनेरवर भारतीय संघाला खास लक्ष देणे गरजेचे आहे.

२ दिवसांपूर्वीच मिचेल सेंटनेरचा वाढदिवस झाला. त्याच्या वाढदिवसाला ICC ने एक व्हिडीओ पोस्ट केला होता. ज्यामध्ये त्याने रोहित शर्माला कशाप्रकारे बाद केले होते हे दाखवले आहे.

मिचेल सेंटनेरने आज देखील भारताच्या २ प्रमुख फलंदाजांना बाद केले. भारतीय संघाने मिचेल सेंटनेरवर खास लक्ष देणे गरजेचे आहे. त्याआधी हा व्हिडीओ देखील १०० वेळा बघायला हवा.

या व्हिडिओमध्ये स्मिथ आणि रोहितला सेंटनेरने एकाचप्रकारे आउट केले आहे. हा व्हिडीओ २०१६ च्या ट्वेन्टी ट्वेन्टी वर्ल्डकप मधला आहे.

बघा व्हिडीओ-

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *