न्यूझीलंडने आजचा सामना जिंकला असला तरी दिनेश कार्तिकच्या या कॅचने मनं जिंकली!

वेलिंग्टन येथे आज भारत आणि न्यूझीलंड संघांमध्ये दौऱ्यातल्या पहिल्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामना खेळवण्यात आला. या सामन्यात सलामीवीर कॉलिन मुनरो आणि टीम सिफर्ट यांनी धमाकेदार सुरुवात करून दिली.

दोघांनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करताना भारतीय गोलंदाजांची लय बिघडवली. सेइफर्टने ४३ चेंडूंत ७ चौकार व ६ षटकार खेचून ८४ धावा केल्या. त्याला मुन्रो (३४), कर्णधार केन विलियम्सन (३४), रॉस टेलर (२३) यांनी साथ दिली. न्यूझीलंडने २१९ धावांचा डोंगर उभारला.

जगातील सर्वोत्तम फलंदाजांची फळी असलेल्या भारतीय संघाला २२० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यात अपयश आले. २२० धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ १३९ धावांवर आटोपला. महेंद्रसिंह धोनी आणि कृणाल पांड्याने शेवटी ५२ धावांची भागीदारी करून भारताला अगदी लाजिरवाणा पराभव होण्यापासून वाचवले.

न्यूझीलंडने भारताला १३९ धावांवर रोखले आणि हा सामना ८० धावांनी जिंकत तीन ट्वेंटी-20 सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. ट्वेंटी-ट्वेन्टी क्रिकेटमधील भारताचा हा सर्वात मोठा पराभव ठरला. ९ वर्षांत भारताचा असा लाजिरवाणा पराभव झाला नव्हता.

दिनेश कार्तिकने जिंकली मनं-

दिनेश कार्तिकने १५ व्या ओव्हरमध्ये मिशेलचा जबरदस्त कॅच घेतला. या जबरदस्त कॅचने भारतीयांची मनं जिंकली. मिशेलने मारलेला बॉल सिक्स जाईल असे वाटत होते. पण दिनेश कार्तिकने हा बॉल अगोदर उडी मारून रोखला आणि परत सीमारेषेमध्ये येऊन जबरदस्त कॅच घेतला.

बघा व्हिडीओ-

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *